आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीस अपघात; रेमंड कर्मचाऱ्याचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगावः ममुराबादकडून स्कूटरवर जळगावकडे येणाऱ्या रेमंड कंपनीतील कर्मचाऱ्याचा गुरुवारी रात्री अपघाती मृत्यू झाला. दगडू मंगा अडकमोल (वय ५५, रा.रायसोनीनगर) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. गुरुवारी ममुराबाद येथे ते नातेवाइकांकडे गेले होते. रात्री १०.३० वाजेच्या सुमारास ममुराबाद नाक्याजवळ त्यांच्या स्कूटर (क्र.एमएच-१९-एन-३८९५) ला अपघात झाला. त्यांची स्कूटर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडली. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. परिसरातील नागरिकांनी अडकमोल यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा मुलगी असा परविार आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती देण्यासाठी शविाजीनगर परिसरातील नागरिकांनी शहर पोलिस ठाण्यात वारंवार फोन केले. मात्र, पोलिस ठाण्यात कर्मचारी नसल्याचे उत्तर ठाणे अंमलदारांनी दिले. पोलिसांच्या या हलगर्जीपणामुळे अडकमोल सुमारे अर्धा तास घटनास्थळीच पडून होते.

नागरिक सरसावले
अपघाताचीमाहिती आणिवाजीनगर परिसरात कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी अडकमोल खडड्यात पडलेले पाहताच नागरिकांनी दुचाकीसह त्यांना खड्ड्यातून बाहेर काढले. त्यानंतर नागरिकांनी रुग्णवाहिका बोलावून अडकमोल यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. थोड्याच वेळात अडकमोल यांची पत्नी नातेवाईकही रुग्णालयात पोहोचले.
पुढील स्लाईडवर पाहा, या अपघाताची इतर छायाचित्रे