आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाळ्यांचे थकित भाडे भरा अन‌् माल घेऊन जा, आयुक्तांनी दिला गाळेधारकांना सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेने सील करून ताब्यात घेतलेले गाळे परत देण्यास आयुक्तांनी सपशेल नकार दिला आहे. यातील साहित्य देण्याची तयारी दाखवली असली तरी आधी भाडेपाेटी असलेली थकबाकी भरा नंतर आपला माल घेऊन जा. ही कारवाई आता सगळ्यांवरच होणार असल्याने कोणीही सुटणार नाही. त्यामुळे तुम्हीच दुकान रिकामे करून चाव्या पालिकेच्या ताब्यात द्या, असा सल्लाही दिला. बैठकीत नेहमी आक्रमक असलेले व्यापारी गुरूवारी सायंकाळी बचावाच्या भूमिकेत पाहायला मिळाले.

सेंट्रल फुले मार्केटमधील मुदत संपलेले ६५५ गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू केली. यात पहिल्याच दिवशी दुकानांना सील करून ताबा मिळवला; परंतु १५ जून रोजी मंत्रालयात बैठक असल्याने तो पर्यंत कारवाई थांबवावी, अशा सूचना पालकमंत्री एकनाथ खडसेंनी केल्याने तूर्त गाळेधारकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, सील केलेले दुकानांचे सील उघडून ते व्यापाऱ्यांना परत करावे किंवा त्यातील साहित्य काढून द्यावे, या मागणीसाठी गुरुवारी गाळेधारकांनी आयुक्त संजय कापडणीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. या वेळी उपायुक्त प्रदीप जगताप उपस्थित होते.

कायद्याच्याचाैकटीत कारवाई : सीलकेलेले गाळे कायमस्वरूपी मनपाच्या ताब्यात आले आहेत. ते परत देण्याचा प्रश्नच नाही. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर पुढची कारवाई सुरू राहणार आहे. आयुक्त या नात्याने गाळे ताब्यात घेण्याचा माझा अधिकार असून काेणत्याही कायद्यात ते परत करण्याचे म्हटले नाही. कायद्याच्या चौकटीत राहूनच मला कारवाई करावी लागणार आहे. दोन वर्षे मुदत दिल्यानंतर आता पुन्हा उच्च न्यायालयाच्या आदेशाने चार आठवड्यांचा अवधी हाेताच त्यानंतरही गाळे रिकामे केल्याने ही कारवाई करावी लागली आहे. मनपाचे गाळेधारकांकडे भाड्यापाेटी पैसे घेणे आहेच. ते भरल्यानंतर दुकानातील जप्त माल परत करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. काेणाच्याही व्यवसायावर गदा आणण्याची इच्छा नाही. कायद्याने जे काही ठरवून िदले त्यानुसार कारवाई सुरू आहे असेही आयुक्तांनी सांिगतले.

कांॅग्रेसचे आयुक्तांना िनवेदन
शहरकांॅग्रेसचे उपाध्यक्ष डाॅ. राधेश्याम चाैधरी यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना िनवेदन देण्यात आले. यात सील केलेली दुकाने परत करण्याची मागणी केली. महापालिकेने केलेली कारवाई ही पूर्वग्रह दूषित असून भेदभावपूर्ण असल्याचे म्हटले आहे. िवशिष्ट समुदायाच्या व्यापारी लाेकांना जाणीवपूर्वक लक्ष करण्यात आल्याचा आराेप केला आहे. तसेच दिवस-रात्र रक्ताचे पाणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार त्वरित करावा, अशी मागणीही डाॅ.चाैधरी, कफील शेख, िडगंबर चाैधरी, डी.एस.कुळकर्णी, नरेंद्र पाटील आदींनी केली आहे.