आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूरच्या धर्तीवर जळगावचा गाळेप्रश्न लवकरच मार्गी लागणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - काेल्हापूर महानगरपालिकेच्या मुदत संपलेल्या गाळ्यांसाठी चालू वर्षाच्या बाजारभावाप्रमाणे भाडे अाकारणीसंदर्भात शासनाने नुकताच निर्णय दिला अाहे. अशीच भूमिका जळगाव महापालिकेनेही पूर्वीपासून घेतली अाहे. त्यामुळे कायद्यातील तरतुदींनुसार कोल्हापूरच्या निकषावर जळगावचाही प्रश्न येत्या २९ नोव्हेंबरला मार्गी लागण्याची शक्यता वर्तवली जात अाहे.
जळगाव महापालिकेच्या मालकीच्या २१७५ गाळ्यांची मुदत मार्च २०१२मध्ये संपली अाहे. तशीच परिस्थिती काेल्हापूर महापालिकेच्या गाळ्यांची अाहे. काेल्हापूर पालिकेने गाळे प्रकरणात दाेन ते तीन ठराव केले हाेते. त्यात तिप्पट पाचपट दंडवसुलीच्या ठरावाच्या अंमलबजावणीत अडचणी येत असल्याने २०१२च्या रेडी रेकनरनुसार अाकारणीचा नवीन ठराव केला हाेता. ताे ठराव काेल्हापूर पालिका अायुक्तांनी विखंडनासाठी पाठवला हाेता. त्यात शासनाने नुकताच ठराव विखंडनाचा निर्णय दिला अाहे. त्यात २०१२च्या तुलनेत २०१६च्या रेडी रेकनरची अंमलबजावणी केल्यास पालिकेचा फायदा हाेणार असल्याचे म्हटले अाहे. हीच परिस्थिती जळगावातदेखील असून, महापालिकेच्या कलम ७९तील तरतुदीनुसार कार्यवाहीच्या निर्णयाला जळगावातील व्यापाऱ्यांनी आव्हान देत शासनाकडे धाव घेतली अाहे. त्यात २९ राेजी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे सुनावणी हाेत अाहे. या वेळी कायद्यातील तरतुदींनुसार चालू बाजारभावाप्रमाणे अाकारणी करावी, हा मुद्दा पुढे येण्याची शक्यता अाहे. त्यामुळे काेल्हापूर महापालिकेसाठी दिलेला निर्णय जळगावसाठीही लागू पडण्याची शक्यता वर्तवली जात अाहे.

अमृत योजनेंतर्गत शहरात २४६ कोटींची पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार अाहे. यात जलवाहिनी टाकण्यासह बांधकामाच्या १९१ कोटींच्या कामांसाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवली अाहे. यासाठी तीन कंपन्यांनी निविदा दाखल केल्या अाहेत. या निविदा गुरुवारी उघडण्यात येणार हाेत्या. परंतु जैन कंपनीने हरकत घेतली अाहे. यावर अद्याप महाराष्ट्र जीवन प्राधिकरण महापालिकेने उत्तर दिलेले नाही. त्यामुळे अाधी उत्तर देण्यात यावे, अशी मागणी केली अाहे. त्यामुळे अमृत याेजनेंतर्गत दाखल निविदा अाता शुक्रवारी उघडण्यात येणार असल्याचे शहर अभियंता तथा प्रभारी उपायुक्त दिलीप थाेरात यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...