आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सृजन 2013 : किल्ल्यातलं बेडरूम जणू झाडाची ढोली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - लहान घरापासून मोठय़ा घरापर्यंत वास्तू पाहिल्या तरी नजरेत भरत नाहीत; पण याच वास्तूंना सौंदर्यदृष्टीने सुरेख बनवण्याच्या भन्नाट कल्पना विद्यार्थ्यांनी साकारली आहे. समोरून पाहिले तर किल्ला आणि आत शिरले की झाडाची ढोली वाटावी, असा मुलांचा सुंदर बेडरूम, 800 स्क्वेअर फुटात टू बीएचकेसह बैठकरूम, स्वयंपाकघर यांचा स्वतंत्रपणे सौंदर्य कसे साकारता येईल, याचे आराखडे (मॉडेल) विद्यार्थ्यांनी भन्नाट कल्पनेतून साकारले आहेत.

भारतीय विद्याभवन केंद्रातर्फे रविवारपासून मोराक्को हॉटेलमध्ये राज्यस्तरीय सृजन 2013 स्पर्धा सुरू झाली. त्यात अंतर्गत सजावट, फॅशन डिझाइन, गृहविज्ञान विभागाचे काही निवडक आराखडे साकारण्यात आले आहेत. यात हॉटेलचाही आराखडा तयार केला आहे. ज्यात पाण्याचा आभास निर्माण करून नैसर्गिक रचना साकारली आहे. विशाल भावसार, राजू जैन, भूपेंद्र भट, अनुभूती महाजन, सुनीता सैनी यांच्या कल्पनेतला हा आराखडा आहे. श्यामकांत कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. के. आर. काबरा, उपाध्यक्ष संजय बिर्ला प्रमुख पाहुणे होते. रितेश पाटील, मोनिशा पांडे हे परीक्षक होते.

छोट्या मुलांचा आनंददायी बेडरूम
लहान मुलांच्या बेडरूममध्ये अगदी मुलांचेच भावविश्व साकारणारा कसा असू शकेल, याचा सुंदर आराखडा तयार केला आहे नूपुर जैन, झुलेखा पटेल, रीतिका तेलगोटे, सायली भावसार यांनी. हा बेडरूमला बाहेरून किल्ला वाटावा, तर आतून एखाद्या झाडाच्या ढोलीत असल्याचा भास व्हावा, अशी सुरेख रचना केली आहे. संपूर्ण भिंती गर्द हिरव्या पानांचा आभास निर्माण करणार्‍या आहेत.

लिव्हिंग रूम
आराखड्यातून अँक्वेटिक (जलीय) थीम घेऊन प्रशस्त लिव्हिंग रूमची कल्पना साकारली आहे भारतीय विद्याभवनच्या नीलेश वसावे, गायत्री ढाके, जिनल जैन, ज्ञानेश्वर कुमावत यांनी.

टाकाऊ वस्तूंमधून ताज हॉटेल, ताजमहाल
टाकाऊ थर्माकोल, कार्डशीट पेपरच्या साहाय्याने ताज हॉटेलचा आराखडा साकारण्यात आला आहे. ताज हॉटेलची वास्तू बनविण्यामागची कल्पनाही या आराखड्यातून विद्यार्थ्यांनी स्पष्ट केली आहे. आर्किटेक्ट महाविद्यालयाचे मोहसीन खान, हर्षल शर्मा यांनी हा आराखडा तयार केला आहे. याच महाविद्यालयाच्या इम्रान देशमुख, प्रांजल फालक यांनी ताजमहालाचे सौंदर्य आराखड्यातून अप्रतिम साकारले आहे. तो साकारताना त्यांनी सलाइन, गोट्या आदींचा वापर केला आहे.