आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jalgaon, St Bus Stapany, Down On Auto Rickshaw At Jalgaon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसटी बसच्या टपावरून स्टेपनी रिक्षावर; गतिरोधकाच्या दणक्यामुळे घडली घटना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महामार्गावरील हॉटेल ड्रिमलॅण्डजवळील गतिरोधकाच्या दणक्यामुळे जळगाव-भुसावळ एसटीच्या टपावरील स्टेपनी अचानक रिक्षाच्या टपावर पडल्याने ते पूर्णपणे वाकले. याप्रकारानंतर महामार्गावर काहीवेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. सुदैवाने रिक्षामध्ये चालकाव्यतिरिक्त एकही प्रवासी नसल्याने कुणालाही दुखापत झाली नाही. ही घटना गुरुवारी दुपारी 3.30 वाजेदरम्यान घडली.

आगारातून गुरुवारी दुपारी भुसावळकडे एसटी (क्र. एमएच-20, बीई-1766) ही मार्गस्थ झाली. गाडी कालिका माता मंदिरासमोरील गतिरोधक पार करताना जोरदार आदळली. दणक्यामुळे टपावर बांधून न ठेवलेली स्टेपनी रिक्षा (क्रमांक एमएच-19, जे-6614)च्या टपावर पडली. या प्रकारामुळे रिक्षाचालक देखील गोंधळला तरीदेखील त्याने सावधपणे रिक्षा रस्त्याच्या कडेला घेतली. याघटनेत रिक्षाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. स्टेपनी पडल्याचे लक्षात आल्यानंतर एसटीचालकाने देखील गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. रस्त्यावर प्रचंड गर्दी झाल्याने वाद निर्माण झाला. या वेळी आगारातील कर्मचारी आल्याने बसचालक व रिक्षाचालकात समजोता होऊन नुकसानीचा खर्च बसचालकाने दिल्याने वाद मिटला.

एसटीच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून पूर्णपणे साधने उपलब्ध करून दिली जात नाही. परिणामी ज्या वेळी अपघात होतो त्या वेळी चालकालाच संकटाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे प्रशासनाने सुरक्षेची साधने उपलब्ध करून द्यावीत.
-भगतसिंग पाटील, जिल्हाध्यक्ष, इंटक कर्मचारी संघटना

अशा पद्धतीने ठेवली जाते एसटीच्या टपावर स्टेपनी
बसच्या टपापासून साधारणत: दीड फूट अंतर असलेल्या कॅरिअरवर स्टेपनी दोन पट्ट्यांमध्ये अडकवली जाते. त्यामुळे ती टायर फीडर क्रेनच्या हुकाने व्यवस्थित ठेवतात. साधारणत: या स्टेपनीचे वजन हे 120 ते 125 किलो (हवेसह) असते.