आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Student Make Smartcard For Ration Shop Froad

आता स्मार्टकार्ड रोखणार रेशनिंगमधील गैरव्यवहार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - रेशन व्यावसायिकांकडे उपलब्ध होणारे धान्य लाभार्थी ग्राहकांपर्यंत पोहचत नाही. त्याची एकरकमी उचल करण्याकडे रेशन दुकानदाराचा अधिक कल असतो. या व्यवहारातून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार धान्याचा काळाबाजार होतो. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गुलाबराव देवकर अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक शाखेच्या विद्यार्थ्यांनी अनाेखे स्मार्टकार्ड तयार केले आहे. आरएफआयडी या तंत्रज्ञानाच्या आधारावर हे स्मार्टकार्ड बनवण्यात आले आहे. याचे प्रात्याक्षिक यशस्वी झाले असून हे संशोधन शासनालाही उपयुक्त ठरणार आहे.

बायोमेट्रिक पद्धतीला जोड
शासनानेबायोमेट्रिक रेशनकार्ड नागरिकांना देण्याची घोषणा केली आहे. यासाठी रेशनदुकानेही पूर्णपणे संगणकीकृत होणार आहेत. त्यानुसार ग्राहकांकडून आधारकार्ड बंॅकखाते याची माहिती संकलित केली जात आहे. शासनाची सबसिडी याद्वारे ग्राहकांना दिली जाणार आहे. देवकर अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले स्मार्टकार्ड या पद्धतीली पूरक ठरणार आहे.

पुरवठा अधिकाऱ्यांचे नियंत्रण
याउपक्रमामुळे प्रत्येक रेशन दुकानदाराचे दैनंदिन हिशेबाचे काम अगदी अचूक राहून पुरवठा विभागातर्फे त्यांच्या दुकानात आलेल्या एकूण धान्यसाठ्यापैकी आज किती धान्य वितरित झाले, हे एका क्लिकवर समजेल. हीच नोंद रेशन दुकानदाराने पुरवठा शाखेला त्याच दिवशी ऑनलाइन पाठवणे बंधनकारक असेल. त्यामुळे पुरवठा शाखेला दुकानदाराकडील उपलब्ध साठा त्यातील तफावत जाणून घेता येईल. यामुळे रेशनदुकानदारांमार्फत काळ्याबाजारात जाणारा माल थांबवता येणे शक्य होईल. यासह ग्राहकांना दिले जाणारे स्मार्टकार्ड हे ओळखपत्र म्हणूनही वापरता येईल. कार्डचा नंबर हा ग्राहकांच्या नावाशी लिंक करण्यात आल्याने कार्ड हरवल्यास लागलीच नवीन कार्डही मिळू शकेल.

या विद्यार्थ्यांची कामगिरी
देवकरमहाविद्यालयातील संगणक शाखेचे विद्यार्थी गौरव मानधुने, उदय महाजन, रोहिदास पाटील, रुपेश फालक यांनी हे संशोधन तयार केले आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे झालेल्या अाविष्कार स्पर्धेत पालकमंत्र्यांनी या उपक्रमाची दखल घेतली असून शासकीय पातळीवर याचा उपयोग करून घेण्याचेही सांगितले असल्याचे या संशोधकांनी सांगितले. विद्यार्थ्यांना प्रा. विक्रम पाटील, विभागप्रमुख प्रा.हरिओम अग्निहोत्री यांनी मार्गदर्शन केले.

असे काम करेल स्मार्टकार्ड
विद्यार्थ्यांनीरेडिओ फ्रिकवेन्सी आयडेंटिफिकेशन रीडर या तंत्राच्या आधारे ऑनलाइन रेशनिंग सिस्टिम सुरू केली आहे. ग्राहकाला दिलेल्या स्मार्टकार्डच्या आधारे एका कुटुंबाला दर महिन्याला त्या कुटुंबासाठी निश्चित असलेल्या धान्य साठ्याचा रेकॉर्ड अपडेट होईल संबंधित ग्राहक ज्या वेळी आपले धान्य घेण्यासाठी दुकानात जाईल, तेव्हा त्यांच्या गरजेनुसार धान्याची एन्ट्री सिस्टिममध्ये करून रेशनदुकानदार कार्ड स्वाइप करेल. त्या वेळी ग्राहकाला उपलब्ध असणारा धान्यसाठा त्या दिवशीचा दर याची माहिती मिळेल. ग्राहकांनंी स्मार्टकार्ड स्वाइप केल्यास त्याच्या खात्यातील धान्यसाठा वजा होऊन तसा तपशील कार्डवर जमा असेल. ग्राहकाने त्यादिवशी असलेल्या धान्याच्या दराचे बिल जमा करताच धान्य ताब्यात मिळेल. तसेच पुढील वेळी त्याच महिन्यात पुन्हा नवीन धान्य घ्यायला आल्यावर अकाउंटवर उपलब्धता असलेल्या प्रमाणातच खरेदी करता येईल.