आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Student Poor English Language Affected There Career

इंग्रजी संभाषण, संवाद कौशल्यात खान्देशी विद्यार्थी पडताहेत मागे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - इंग्रजी भाषेची समस्या आणि प्रभावी संवाद कौशल्याचा अभाव असल्याने खान्देशी विद्यार्थ्यांना चांगल्या नोकरीच्या संधीसाठी खूप वाट पाहावी लागत असल्याचे दिसून आले आहे. '
बांभोरी येथील श्रमसाधना ट्रस्टच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ही बाब प्रकर्षाने जाणवली. यापूर्वीदेखील शहरात विविध महाविद्यालयात कॅम्पस इंटरव्ह्यू झाल्या. तेथे देखील असाच अनुभव आला आहे.

जळगाव परिसरातील मुला-मुलींमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. मुंबई, पुणे आणि नागपूरच नव्हे, तर उत्तरेतील राज्यांपेक्षाही येथील मुले तांत्रिक दृष्टीने एक पाऊल पुढेच आहेत. परंतु इंग्रजी संभाषण आणि संवाद कौशल्याचा अभाव असल्याने चांगल्या नोकरीसाठी त्यांना वाट पाहावी लागते, असे मत एल अॅण्ड टी इन्फोटेक कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक अभिषेक पटनायक यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.
राज्यातील इतर ठिकाणांपेक्षा उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये मेहतन करण्याची तयारी, अभियांत्रिकी विषयातील रूची आणि गुणवत्ता पाहता एल अॅण्ड टी कंपनी मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून जळगावला प्राधान्य देत आहे. त्यात आलेल्या अनुभवानुसार पटनायक यांनी हे विश्लेषण केले आहे.

गुणवत्ता चांगली : राज्यातील पुणे, मुंबईसह इतर मोठ्या शहरांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी संभाषण, संभाषण कौशल्य, बॉडी लँग्वेज, आत्मविश्वास आदी बाबी प्रामुख्याने आढळून येतात, तर गुणवत्तेचा अभाव दिसून येतो. उत्तर महाराष्ट्रात नेमकी स्थिती पूर्णपणे वेगळी आहे. येथील विद्यार्थी गुणवत्तेत हुशार आहेत, त्यांचा दृष्टिकोनही सकारात्मक आहे तसेच तांत्रिक बाबी आणि गुणांबाबत विद्यार्थ्यांची मेहनत घेण्याची तयारीही आहे.

या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज : महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्षात नियमित विषयांसोबत संभाषण कौशल्य, इंग्रजीचा अतिरिक्त क्लास घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी दररोज इंग्रजी वर्तमानपत्र आणि इंग्रजी कादंबऱ्या, पुस्तके वाचली पाहिजे. विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष दिल्यास विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड दूर होईल. त्यात सुधारणा केल्यास नोकरीच्या संधीही सहज मिळे, असे पटनायक यांनी सांगितले.