आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Sudharma Organisations Support To Education

कुसुंब्यात ‘सुधर्मा’कडून ज्ञानदानाचे धडे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- कुसुंब्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गाेडी; पण शिक्षक नाही. चार खाेल्यांची शाळा अपूर्ण पडायला लागली. मग विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी जळगावातील सुधर्मा संस्था धावून अाली अन् पंधरा दिवसांतच शाळेची पटसंस्था ५०वर गेली.
सुधर्मा संस्थेच्या माध्यमातून शिक्षण घेणारे विद्यार्थी अाज शिक्षणाचे धडे देऊ लागले. कधी काळी ही मुले कचरा वेचत हाेती. परंतु सुधर्माने त्यांना शैक्षणिक प्रवाहात अाणले. अाता तेच िशक्षक झाले. जळगाव-अौरंगाबाद महामार्गावर कुसुंबा हे गाव आहे. या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर उजाड कुसंुबा हे जवळपास १०० घरे आणि ६०० लोकवस्तीचे गाव आहे. गावात तीन वर्षांपासून विजेची सोय नाही की पाण्यासाठी नळ नाहीत. लाेकांना दूरवरील विहिरीतून पाणी आणावे लागते. गावात एसटी बसही येत नाही. तडवी, भिल्ल समाजाची घरे येथे आहेत. जिल्हा परिषदेने पहिली ते पाचवीच्या मुलांसाठी चार वर्ग खोल्यांची शाळा येथे बांधली. मात्र, दाेनच शिक्षक दिले. मुलांना शाळेची गोडी मात्र, शिक्षक नाहीत, सुविधा नाहीत. यामुळे गावाचा शैक्षणिक विकास झाला नाही. त्यामुळे सुधर्मा संस्थेने फेब्रुवारीपासून गावात असलेल्या मारुती मंदिरावर शाळा भरवायला सुरुवात केली आहे. रविवारी शाळेचा १५वा दिवस अन् पटसंख्या होती ५०. मराठीच्या कविता, पाढे यांच्यासह एबीसीडीचे बोल अख्या गावात घुमत होते. हा आवाज ऐकून गावकऱ्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत. मुलांना शिक्षणाची गोडी पाहता, पालकही मंदिराच्या अवती-भवती येऊन ही शाळा पाहत आहेत.
चार जणांनी केली सुरुवात
सुधर्माचेसंस्थापक हेमंत बेलसरे आणि संस्थेच्या माध्यमातूनच एसवायबी कॉमचे महाविद्यालयीन शिक्षण घेणारे समाधान पाटील, राकेश पाटील (दोघे रा. कुसंुबा) आणि राेहित थोरात (फार्मसी) हे तीन विद्यार्थी अशा चौघांनी मिळून या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा िवडा उचलला आहे. गावात पहिली ते नववीदरम्यान एकूण ७३ विद्यार्थी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांची यादी तयार करून राेज त्यांची हजेरी घेतली जाते. दररोज पाच ते सात या वेळेत मंदिरावर शाळा भरते. संस्थेने मुलांना वही, पेन, पाटी, पेन्सिल अादी साहित्यही पुरवले आहे.

सुधर्मातर्फे दरवर्षी असा एक अनाेखा उपक्रम हाती घेतला जातो. यंदा मुलांना शिकवण्याचा उपक्रम घेतला आहे. रविवारपासून कुसंुब्यातील एका संगणकाच्या क्लासमध्ये या मुलांना घेऊन जाऊन संगणकाची ओळख करून देण्यात येणार आहे. हेमंतबेलसरे, सुधर्मा
सुधर्माने सुरू केलेल्या वर्गातून विद्यार्थ्यांमधील शिक्षणाची गोडी जाणवते. संपूर्ण गाव सुधर्मा संस्थेच्या पाठीशी आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेनेही शिक्षकांची संख्या वाढवली पाहिजे. -सोपानगायकवाड, पालक