आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बोरोले यांचा बॅँक तपशील हस्तगत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - कोट्यवधी रुपयांच्या ठेवींचा घोटाळा केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले तापी पतसंस्थेचे चेअरमन तथा एकनाथ खडसे यांचे व्याही सुरेश बोरोले यांच्या बॅँक व्यवहारांचा तपशील तपासाधिकारी विश्वास शित्रे यांनी चोपडा येथील चार बॅँकांमधून शनिवारी हस्तगत केला.
पोलिस कोठडीत शुक्रवारी तपासाधिकारी चित्रे यांनी चौकशीदरम्यान बोरोले यांच्याकडून बॅँक व्यवहारांसंदर्भात माहिती घेतली होती. त्यानंतर शनिवारी तपासाधिकारी शित्रे यांनी पथकासह चोपडा येथे जाऊन देना बॅँक, बॅँक ऑफ इंडिया, चोपडा अर्बन सहकारी बॅँक व तापी पतसंस्था या चारही बॅँकांमधून बोरोले यांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती घेऊन तसा तपशील ताब्यात घेतला. या तपशिलाच्या आधारे शित्रे पुढील तपास करणार असून, बोरोले यांच्या उर्वरित बॅँक खात्यांचीदेखील पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे.
घरचा डबा नाही - पोलिस कोठडीत असलेले तापी पतसंस्थेचे चेअरमन डॉ.सुरेश बोरोले यांनी जेवणासाठी घरचा डबा व कपडे मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर मुख्य न्यायदंडाधिकारी र्शीमती एम.व्ही.देशपांडे यांच्या न्यायासनासमोर कामकाज चालले. त्यात न्यायालयाने जेवणाचा डबा व कपडे देण्याचा अर्ज फेटाळून लावला; मात्र जवळचे नातेवाईक व वकिलांना भेटण्याची परवानगी दिली.