आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीतील आरोपी हाती लागला ‘बीस साल बाद’, चोरट्याने मिळवली होती शासकीय नोकरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - चोरी करून फरार झालेला चोरटा तब्बल 20 वर्षांनंतर पोलिसांच्या हाती लागला आहे. या चोरट्याने औरंगाबाद येथे वास्तव्य करून शासकीय नोकरी देखील मिळवली होती. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे घडलेला हा प्रकार जळगावशीच संबंधित आहे.

वीस वर्षे पोलिसांना हुलकावणी देणार्‍या या चोरट्याचे नाव राजेश पोपट जाधव असे आहे. पोलिसांनी त्याला 6 ऑगस्टला औरंगाबाद येथून अटक केले होते. विशेष म्हणजे अटक करतेवेळी राजेश हा औरंगाबाद डेपोमध्ये एसटी चालक पदावर नोकरीवर होता.