आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon To Be Seaching Alternative Option Than Girana Water

जळगावसाठी शोधावा लागणार गिरणाच्या पाण्‍याऐवजी दुसरा पर्याय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- वाघूर धरणात कमी होत चाललेली पाण्याची पातळी लक्षात घेता शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून महापालिकेकडून गिरणेचे आवर्तन सोडण्याची मागणी महापौरांनी केली आहे. मात्र, आवर्तन सोडण्याबाबत जिल्हा प्रशासन फारसे अनुकूल नाही. पालकमंत्री आणि विभागीय आयुक्तांकडे मागणी करून जिल्हाधिकार्‍यांनी नकार दिला आहे. त्यामुळे महापालिकेला आता दुसरा पर्याय शोधावा लागणार आहे. दरम्यान, टंचाईचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी महापौरांनी मंगळवारी सर्वपक्षीय नगरसेवकांसोबत जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन चर्चा केली.

गिरणा प्रकल्पातून चाळीसगाव, पाचोरा आणि धरणगाव तालुक्यासाठी सोमवारी आवर्तन सोडण्यात आले. हे पाणी दहिगाव बंधार्‍यापर्यंत येणार आहे. त्यात आणखी वाढ करून जळगावसाठी दापोर्‍यापर्यंत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी महापौर किशोर पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली. गिरणेच्या पाण्यामुळे शहराचा दोन महिन्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याचा दावा महापौरांनी केला आहे.

पर्यायी स्रोत शोधावे लागणार

गिरणेचे पाणी शहराला देताना पाण्याचा अपव्यय होणार असल्याने जिल्हाधिकारी पाणी देण्यास इच्छुक नाहीत. त्यांनी यापूर्वीदेखील शक्यता फेटाळून लावली आहे. शहरासाठी दुसर्‍या पर्यायाबाबत ते पालकमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. एमआयडीसी आणि वाघूर हे दोन स्त्रोत सध्यापुरते असल्याने जिल्ह्यातील इतर गावांचाही विचार करावा लागणार आहे.

यांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट

महापौर किशोर पाटील, उपमहापौर अनिल वाणी, विरोधी पक्षनेत्या प्रतिभा देशमुख, खान्देश विकास आघाडीचे गटनेते नितीन लढ्ढा, सदाशिव ढेकळे, राजकुमार अडवाणी, प्रा.चंद्रकांत सोनवणे, सुरेश भोळे, विजय गेही, करीम सालार, अजय सपकाळे, दिलीप बाविस्कर, आशा सूर्यवंशी, हर्षा सांगोरे, सरिता सपकाळे, जयर्शी पाटील.
प्रशासन उदासीन
महापालिकेकडे वाघूर, एमआयडीसीची पाइपलाइन, शहरातील इतर स्रोत हे पर्यायी स्रोत आहेत. गिरणेचे पाणी दापोर्‍यापर्यंत सोडल्यास मोठय़ा प्रमाणावर पाण्याची नासाडी होणार आहे. नदीपात्रातील खड्डे, अडथळे यामुळे पाणी वाया जाईल. हे पाणी वाचल्यास इतर गावांना पाणी देणे शक्य होणार आहे. पाऊस येईपर्यंत आहे तेच पाणी पुरवायचे असल्याने जिल्हाधिकारी महापालिकेसाठी पाणी सोडण्यास इच्छुक नाहीत.
पालकमंत्री, आयुक्तांकडेही मागणी
गिरणेतील पाण्यासाठी महापालिकेतर्फे महापौरांनी पालकमंत्री गुलाबराव देवकर आणि विभागीय आयुक्त रवींद्र जाधव यांच्याकडे देखील मागणी केली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील टंचाईचा सारासार विचार करूनच आवर्तन सोडले जात असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.
100 दशलक्ष घनफूट पाण्याची गरज
दापोरा प्रकल्पात 100 दशलक्ष घनफूट पाणी सोडल्यास शहरास पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठा करणे शक्य होईल. सध्या गिरणेच्या आवर्तनातून 650 दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येत आहे. दापोरा प्रकल्पात पाणी पोहोचण्यासाठी दुपटीने पाणी सोडावे लागेल. दोन आवर्तनाचे पाणी एकदाच सोडावे लागणार असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी नकार दिला आहे.