आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच गळतींच्या दुरुस्तीनंतर अाज पाणीपुरवठा होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मेहरूणभागातील भिल्ल वस्तीजवळ वाघूरच्या मुख्य जलवाहिनीला काही दिवसांपासून गळती सुरू हाेती. त्या गळतीचे काम बुधवारी सुरू करण्यात अाले हाेते, ते गुरुवारी सकाळी पूर्ण झाले. चार ठिकाणी पाइप जाेडणीचे काम झाल्यानंतर सायंकाळी जलकुंभ भरण्यात अाले. त्यामुळे शुक्रवारी पाणीपुरवठा करण्यात येणार अाहे.

मेहरूण भागातून जाणाऱ्या १२०० मिमीच्या जलवाहिनीला ठिकाणी गळती हाेती. त्यामुळे बुधवारी सकाळपासून रात्रभर काम सुरूच हाेते; तर सकाळी ११ वाजता अंतिम दुरुस्तीचे काम अाटाेपले. या दरम्यान मेहरूणमध्ये चार ठिकाणी पाइप जाेडणी करण्यात अाली, तर अार.सी.बाफना गाेशाळेसमाेरील मुख्य जलवाहिनीला असलेली गळतीही राेखण्यात अाली. यात मुख्य व्हाॅल्व्हचे काम पूर्ण करण्यात अाले. पालिकेने नव्याने नियुक्ती केलेले मक्तेदार एस.डी.भाेळे यांच्यामार्फत हे काम पूर्ण करण्यात अाले अाहे. अागामी काळातही नियाेजन करून वेगवेगळ्या दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याचे अभियंता डी.एस.खडके यांनी सांगितले.

अाजचा पाणीपुरवठा
वाल्मीक, कांचन, अक्सा, अयाेध्यानगर, रामेश्वर, मास्टर काॅलनी, नित्यानंदनगर टाकी, खंडेरावनगर, मानराज टाकीवरील भाग, खाेटेनगर टाकीवरील भाग, गेंदालाल मिल टाकीवरील भाग, याेगेश्वरनगर, डीएसपी बायपास, तांबापुरा, गिरणा टाकी अावारातील उंच टाकीवरून हाेणारा पुरवठा यात वाघनगर, हरिविठ्ठलनगर, शिव, विद्युत काॅलनी, राका पार्क, पाेस्टल काॅलनी, विवेकानंदनगर, जिल्हा राेड, रामदास, शारदा काॅलनी, महाबळ काॅलनी परिसर, अाॅफिसर क्लब टाकी परिसर.

शनिवारचा पुरवठा
खंडेरावनगर भागातील पिंप्राळा गावठाण, उर्वरित भाग पिंप्राळा हुडकाे, सेंट्रल बँक काॅलनी, अाशाबाबानगर, मानराज टाकी, शिंदेनगर, अष्टभुजा वाटिका अाश्रम परिसरातील राहिलेला भाग, खाेटेनगर टाकीवरील राहिलेला भाग, निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा काॅलनी, अाहुजानगर, निमखेडीचा राहिलेला भाग, नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसाेनीनगर, समतानगर, साने गुरुजी काॅलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर, यशवंतनगर अादी भागात पाणीपुरवठा हाेईल.

मेहरूण परिसरातील वाघूरच्या जल वाहिनीच्या दुरूस्तीचे काम गुरुवारी सकाळी पूर्ण झाले. त्यानंतर संध्याकाळपर्यंत पाइपजोडणीचे काम सुरू होते.