आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक कोंडीने जळगावकर वेठीस,बेशिस्त वाहनचालकांमुळे अजिंठा चौफुलीवर तीन तास वाहतूक ठप्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राष्ट्रीय महामार्गावर बेशिस्तपणे वाहने उभी केली जात असल्यामुळे महामार्गावर वाहतूक ठप्प होण्याचा प्रकार हा नित्याचा झाला आहे. यािवषयी अनेक वेळा वाहनधारक वाहतूक शाखेकडे तक्रारी करता पण कुणीही या समस्येकडे गार्भीयाने लक्ष देत नसल्याने दिवसेंदिवस ही समस्या गंभीर होत आहे. वास्तविक चौकाचौकात वाहतूक पोलिस ड्यूटीवर असतात. तरीदेखील ही वाहतूक का ठप्प होते? हा संशोधनाचा विषय झाला आहे. वाहतुकीची समस्या आिण अंजिठा चौक सुशोभिकरणाबाबत दव्य मराठीने अभियान राबवले होते. त्यामुळे रस्त्यावर बेिशस्तपणे ट्रक उभ्या करणाऱ्या चालकांवर कारवाई सुरू झाली आहे. पण त्या कारवाईत सातत्य नसल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. बुधवारीदेखील बेशिस्त वाहनचालकांमुळे अजिंठा चौफुलीवर तीन तास तर अपघातामुळे नेहरू चौकात एक तास वाहतूक ठप्प झाली होती. या सर्व प्रकारामुळे जळगावकर नाहक वेठीस धरले जात आहे.

अंजिठा चौफुलीवर नेहमी होतोय खोळंबा
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर अजिंठा चौफुलीवर बेशिस्त वाहनचालकांमुळे बुधवारी सकाळी 11 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेतेची बराच वेळ वाहतूक पोलिसांना माहिती नसल्याने वाहनधारकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. वास्तविक अजिंठा चौफुलीवर वाहतूक पोलिसांची हजेरी कायम आवश्यक आहे. मात्र, अनेक वेळा याठिकाणी वाहतूक पोिलस जागेवर नसल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. तसेच महामार्गावर दोन्ही बाजूला अतिक्रमण झाल्याने देखील वाहतूक ठप्प होत असते.
नेहरू चौकात एक तास वाहतूक ठप्प
नेहरू चौकात बुधवारी सकाळी ११.४० वाजेच्या सुमारास रिक्षाला (एमएच-१९-बीजे-७९२३) मागून येणाऱ्या एसटी बसने (एमएच-२०-डी-९७८३) धडक िदली. त्यामुळे रिक्षाचालक आणि बसचालकात सुमारे तासभर वाद सुरू होता. परिणामी तासभर नागरिकांना वाहतूक खोळंब्याचा त्रास सहन करावा लागला. या चौकात वाहतूक पोिलस कर्मचारी हजर राहत नसल्याने दररोज वाहनधारकांचे वाद होत असतात. तसेच रस्त्यावर दोघी बाजूला बेशिस्तपणे रिक्षा उभ्या राहतात. तसेच दुकानदाराचे देखील अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे या परिसरातदेखील पोलिस व महापालिका प्रशासनाने अतिक्रमणाची मोहीम राबविणे गरजेचे झाले आहे.