आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - बसने शाळेतून घरी जात असताना वाहतुकीच्या कोंडीची समस्या दररोज डोकेदुखीचा विषय झाला होता. या समस्येवर काही तोडगा काढता येईल का? या विषयी विचार करताना पाच वर्षांपूर्वी हैद्राबादला पाहिलेला ‘फ्लायओव्हर ब्रिज’ डोळ्यासमोर आला. तसे उड्डाणपूल जर जळगावात झाले तर या समस्येवर तो मोठा पर्याय ठरेल अशी युक्ती चटकन मनात आली अन् वाहतुकीची कोंडी मिटवणारे मॉडेल सहज तयार झाले. हे हायटेक मॉडेल साकारण्यास आर.आर.विद्यालयातील नववीचा विद्यार्थी र्शेयस लावणे यास यश आले आहे. या मॉडेलच्या माध्यमातून र्शेयसने केलेल्या सूचना व उपाययोजनांचा जर अवलंब केला तर निश्चितच वाहतुकीची कोंडी सुटेल शिवाय प्रदूषणही कमी होण्यास मदत होणार आहे.
अशी सुचली कल्पना
श्रेयस असोदा येथे राहतो. शाळेसाठी त्याला दररोज असोदा ते जळगाव एसटीने प्रवास करावा लागतो. प्रवास करताना सिग्नलवर वाया जाणारा वेळ, वाहनाच्या गर्दीमुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि इंधनाची नासाडी या सर्व गोष्टींबाबत तो नेहमी विचार करीत असे. यावर आपण काही तोडगा काढू शकतो का? असा विचार करीत असताना डोळ्यासमोर चटकन(पाचवीत असताना हैद्राबाद सहलीत पाहिलेला)‘फ्लायओव्हर ब्रिज’ आला. तसे उड्डाणपूल जर जळगाव शहरात उभारण्यात आले तर निश्चितच वाहतुकीची समस्या सुटेल त्यामुळे हाच उत्तम पर्याय ठरेल अशी युक्ती मनात आली. हा योगायोग एका प्रोजेक्टच्या माध्यमातून साकारण्यास सुरुवात केली अन् हायटेक असे मॉडेल तयार झाले.
प्रोजेक्टसाठी लागला 630 रुपये खर्च!
मॉडेल तयार करण्यापूर्वी त्याने वर्गात कागदावर एक आकृती काढली. यासाठी र्शेयसने 630 रुपये खर्च करून कार्ड बोर्ड आणला. त्यावर त्याने 83 बाय 83 सेंटिमीटर आकाराचा सिग्नलविरहित चौफुली हा प्रोजेक्ट (मॉडेल) तयार केला.
प्रोजेक्ट तयार करण्यास लागला एक महिना
श्रेयसने डिसेंबर 2012 मध्ये प्रोजेक्टला सुरुवात केली. या दरम्यान तो उड्डाणपूल पाहण्यासाठी नाशिक येथेही जाऊन आला. त्यानंतर थर्माकोल, आर्ट पेपर, कार्ड बोर्ड, लाकडी पट्टय़ांचा वापर करून पूल सिस्टीम आणि उड्डाणपूल तयार केले आहे. रस्त्यावर चौफुली तयार करण्यापेक्षा पूल तयार करून एका रस्त्याच्या खालून दुसरा रस्ता जाईल, अशी व्यवस्था तयार केली आहे. त्यामुळे अपघात होण्याचे प्रमाण कमी होईल, असा दावाही मॉडेलच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.