आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाघूर प्रकरण - दिवसभर कागदपत्रांची करण्यात आली तपासणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगाव नगरपालिकेने राबविलेल्या वाघूर पाणीपुरवठा योजनेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी नगरसेवक नरेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास वेगात सुरू झाला आहे. बुधवारी पोलिस उपअधीक्षक पंढरीनाथ पवार यांनी दिवसभर कागदपत्रांची तपासणी केली.

वाघूर योजेनेत कोट्टय़वधी रुपयांचा घोटाळा झाला असल्याची तक्रार नगरसेवक पाटील यांनी पोलिसांकडे दिली होती. या तक्रारीची चौकशी केल्यानंतर पोलिस अधीक्षकांच्या आदेशावरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक पंढरीनाथ पवार यांचेकडे देण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक पवार यांनी महापालिकेकडून याबाबतची काही कागदपत्रे पत्रव्यवहार करून मागवली होती. पोलिसांनी मागवलेली कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्या कागदपत्रांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. हा गुन्हा कागदपत्रांवरच आधारित असल्याने पोलिसांना हा तपास सखोल पद्धतीने करावा लागणार आहे.

कायद्याच्या चौकटीत राहून कराव्या लागणार्‍या तपासात कोणतीही चूक राहू नये. यासाठी बुधवारी पोलिस उपअधीक्षक पंढरीनाथ पवार हे स्वत: दिवसभर बसून कागदपत्रांची पाहणी करीत होते. त्याचबरोबर उपलब्ध असलेल्या कागदपत्रांतून तपासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या बाबी काढण्याचे काम सध्या सुरू आहे.
सुटीच्या दिवशीही कागदपत्रांचा शोध - नगरपालिकेने राबविलेल्या विविध प्रकल्पांची सध्या चौकशी सुरू झाली असून पोलिसांनी मागविलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कर्मचार्‍यांची चांगलीच दमछाक होत आहे. गुरुवारी रक्षाबंधनाची सुटी असतानाही काही कर्मचार्‍यांना रस्ते पेव्हर करणे व अन्य प्रकरणांची कागदपत्रे धुंडाळण्याचे काम करावे लागणार आहे. नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी जळगाव नगरपालिकेने राबविलेल्या विविध योजनांत झालेल्या अपहारप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. यातील वाघूरप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अटलांटा, विमानतळ यासह अन्य प्रकरणांचा गुन्हा दाखल करायचा असल्याने यासंबंधी कागदपत्रांची मागणी पोलिसांकडून करण्यात येत आहे. आठवडाभरातील कामकाजात हे काम होत नसल्याने गुरुवारी सुटी असतानाही काही कर्मचार्‍यांना खास या कामासाठी बोलावण्यात आले आहे.
वाघूर घोटाळा - महापालिकेतून अनेक महत्त्वाचे संदर्भ गहाळ