आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलवाहिनी गळती दुरुस्तीचे काम पूर्ण, शनिवारपासून शहरात पाणीपुरवठा पूर्ववत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मेहरूण परिसरातील मुख्य जलवाहिनीवरील गळतीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी दुपारी पूर्ण झाले. गुरुवारी सकाळी 11.00 वाजेपासून सुरू झालेले काम सलग 27 तास चालले. पाइप बदलल्यानंतर सायंकाळी जलकुंभ भरण्याचे काम सुरू झाल्याने ठरल्याप्रमाणे शनिवारपासून शहरात पाणीपुरवठा सुरू होणार आहे.
वाघूर धरणावरून शहराला पाणीपुरवठा करणार्‍या 1,200 मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला मेहरूण परिसरात तीन ठिकाणी गळती लागली होती. नोव्हेंबर महिन्यात दोन ठिकाणी दुरुस्तीचे काम केल्यावर गुरुवारपासून गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे पुरवठा थांबवण्यात आल्याने शुक्रवारी शहरातील पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. तथापि, शुक्रवारी दुपारी 2.00 वाजता हे काम पूर्ण झाले.
आज या भागात पाणी
वाल्मीकनगर, कांचननगर, दिनकरनगर, आसोदा रोड व परिसर, मेहरूणमधील रामेश्वर कॉलनी, एमडीएस कॉलनी, मास्टर कॉलनी, अक्सानगर, अयोध्यानगर, मोहननगर, नेहरूनगर, हरिविठ्ठलनगर, पिंप्राळा गावठाण, मानराज पार्क, दांडेकरनगर, आसावानगर, निसर्ग कॉलनी, द्रौपदीनगर, मुक्ताईनगर, धनर्शीनगर, पोलिस कॉलनी, खोटेनगर, शिवाजीनगर, हुडको, प्रजापतनगर, एसएमआयटी परिसर, तांबापुरा, गणपतीनगर, आदर्शनगर, वाघनगर, शिव कॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंदनगर, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी, योगेश्वरनगर, हिरा पाइप व खेडी परिसर.