Home »Maharashtra »North Maharashtra »Jalgaon» Jalgaon Water Problem.

जळगावकरांनो आज राहणार पाणीपुरवठा बंद

प्रतिनिधी | Apr 29, 2012, 10:42 AM IST

  • जळगावकरांनो आज राहणार पाणीपुरवठा बंद

जळगाव - शहरातील पाइप-लाइनला असलेल्या किरकोळ गळतींची सवय झालेल्या जळगावरांना मोठय़ा गळतीचा सामना करावा लागणार आहे. कंडारीजवळ 1168 मि.मी.च्या पाइप-लाइनला असलेल्या गळतीची दुरुस्तीचे काम मनपातर्फे हाती घेण्यात आल्याने रविवारी होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. पाणी येणार म्हणून बाहेर जाण्याचा बेत रद्द केलेल्या गृहिणींनो आता सोमवारी पाणीपुरवठा होणार आहे. तसे महापालिकेतर्फे कळविण्यात आले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून मोठय़ा गळतींचे प्रमाण कमी झाल्याने पाणीपुरवठा बंद करण्याची वेळ महापालिकेवर आली नव्हती. त्यामुळे पाणीपुरवठा नियमित जरी होता तरी दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठय़ासंदर्भात नागरिकांचा रोष निर्माण झाला आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून वाघूर धरणाजवळील पालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रापासून निघालेल्या पाइप-लाइनला कंडारी गावाजवळ गळती होत होती. परंतु त्याचा शोध लागत नसल्याचे सांगण्यात येत होते. अखेर मनपाच्या कर्मचार्‍यांनी गळतीचा शोध घेतला असून त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. 1168 मि.मी.च्या पाइप-लाइनला असलेल्या गळतीचे कारण ब्लॉक उघडल्याशिवाय कळणार नसल्याने अगोदर त्याची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यानंतर वेल्डिंगकरून गळती बंद करण्यात येणार आहे. त्यासाठी एक दिवसाचा कालावधी लागणार असल्याने 29 रोजी होणार पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असून रविवारचा पाणीपुरवठा 30 रोजी करण्यात येणार आहे. तर 30 एप्रिल रोजी होणारा पाणीपुरवठा 1 मे रोजी होणार आहे. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

Next Article

Recommended