आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव पालिकेची अतिरिक्त पाण्यासाठी धडपड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - वाघूरमधून मिळणार्‍या पाण्यात कपातीचे संकट ओढवल्यास अतिरिक्त पाणी मिळवण्यासाठी पालिकेची धडपड सुरू आहे. त्यासाठी एमआयडीसीकडून दररोज 15 एमएलडी पाणी घेण्याकरिता 10 वर्षांपासून बंद पाइपलाइनची दुरुस्ती केली असून, मंगळवारी पालिका अधिकार्‍यांकडून चाचणी घेण्यात आली.

1997मध्ये पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तातडीने एमआयडीसी ते गिरणा टाकीपर्यंत 500 मिलिमीटर व्यासाची पाइपलाइन टाकण्यात आली होती. नंतर टंचाईचे निवारण झाल्यावर 2002-03पासून एमआयडीसीकडून पाणी घेण्याची आवश्यकता न पडल्याने या पाइपलाइनचा वापर होत नव्हता. 7 किलोमीटर लांबीची ही पाइपलाइन मानराज मोटर्सजवळील नाल्यातून गेली असून, 11 मीटर लांबीचा पाइप औद्योगिक वसाहतीतील रसायनांमुळे गंजली होती. कमी पावसामुळे यंदा पाणीटंचाईसदृश स्थिती लक्षात घेऊन एमआयडीसीकडून पाणी घेण्याची वेळ आल्याने या पाइपलाइनचा पुन्हा वापर करण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत एमआयडीसीकडून पाणी उचल करण्यासाठी रेमंड चौफुलीजवळून गिरणा टाकीपर्यंत दुसरी एक पाइपलाइन आहे; मात्र त्यावरून 15 एमएलडी पाणी उचल करणे शक्य नव्हते. त्यामुळे बंद असलेल्या या पाइपलाइनचा गरज पडल्यावर वापर करण्यात येणार आहे.

पाइप बदलवण्याचे काम पूर्ण झाल्यावर मंगळवारी पालिकेच्या अधिकार्‍यांनी तिची चाचणी घेतली. या वेळी आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकरसह पालिका अधिकारी उपस्थित होते.


पाइपलाइनची फक्त चाचणी

पाइपलाइनची तपासणी करण्यासाठी एमआयडीसीकडून पाणी उचलण्यात आले होते; मात्र शेवाळ, गंज व इतर घाण वाहून येत असल्याने पंचमुखी महादेव मंदिराजवळील व्हॉल्व्ह उघडण्यात येऊन सुरुवातीचे सांडपाणी नाल्यात सोडण्यात आले होते. 500 मिलिमीटर व्यासाच्या या पाइपातून हे पाणी एकाच वेळी बाहेर येत असल्याने पाइपलाइन फुटल्याचा गैरसमज झाला असावा. नितीन बरडे, सभापती, पाणीपुरवठा

05
एमएलडी पाणी वहनक्षमता
07
किलोमीटर लांबीचा पाइप
10
वर्षांपासून वापर बंद
500
मिलिमीटर पाइपचा व्यास