आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात शिरसोलीजवळ मेहरूण भागातील युवकाची गळा कापून निर्घृण हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत्यू झाल्याचे कळताच जिल्हा रुग्णालयात आक्रोष करताना नवीदअख्तरची आई नातेवाईक. - Divya Marathi
मृत्यू झाल्याचे कळताच जिल्हा रुग्णालयात आक्रोष करताना नवीदअख्तरची आई नातेवाईक.
 जळगाव : शहरातील मेहरूण भागात राहणाऱ्या १८ वर्षीय युवकाला बेदम मारहाण करून तसेच गळा कापून निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. नवीद अख्तर शफियुद्दीन पिरजादे असे मृत युवकाचे नाव आहे. तो शुक्रवारी रात्री १० वाजेपासून बेपत्ता होता. शिरसोलीच्या आकाशवाणी केंद्राच्या मागे त्याचा अर्धनग्न मृतदेह आढळून आला. 
 
दत्तनगरातील शफियुद्दीन पिरजादे हे हातमजुरी करतात. त्यांचा तिसऱ्या क्रमांकाचा मुलगा नवीद अख्तर हा बीजे मार्केट येथे शरीफ खान यांच्याकडे तसेच अजिंठा चौफुलीवर एका भंगाराच्या दुकानात काम करत होता. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता तो शरीफ खान यांच्याकडून कामाचे १०० रुपये घेऊन सायंकाळी घरी रोजा इफ्तार केला. त्यानंतर रात्री ८ वाजता परिसरातील फातेमा मशीदमध्ये कुराण पठणासाठी गेला होता.
 
मशिदीतून रात्री १० वाजता बाहेर पडल्यानंतर तो घरी आला नाही. त्यामुळे वडिलांनी त्याच्या मोबाइलवर तीन-चार वेळा फोन केला. मात्र, त्याचा मोबाइल बंद अाला. तर शनिवारी सकाळी ८ वाजता शिरसोली परिसरातील काही लोकांना आकाशवाणी केंद्राच्या मागच्या रस्त्याच्या कडेला झुडुपात मृतदेह आढळून आला.
 
याबबात शिरसोलीचे पोलिस पाटील शरद पाटील ग्रामपंचायत सदस्य अकिल मणियार यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करून दुपारी ११.३० वाजता मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. शवविच्छेदन करून दुपारी २.४५ वाजता कुटुंबियांच्या ताब्यात मृतदेह दिला. तत्पूर्वी आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला होता. पोलिसांनी समजुत काढवा. या प्रकरणी शफीउद्दीन पिरजादे यांनी फिर्यादी दिली आहे. 

दाढीवर देखील तीक्ष्ण हत्याराने वार 
नवीद अख्तरच्या अंगात केवळ एक फाटका बनियन होता. त्याचे इतर कपडे घटनास्थळी आढळून आले नाही. मृतदेहाच्या आजूबाजूला रक्त सांडलेले होते. त्याचा गळा चिरला होता. गळ्याच्या उजव्या बाजूला धारदार शस्त्राने खोल खड्डा पडला होता. दाढीवर देखील तीक्ष्ण हत्याराने वार केले आहेत.
 
उजव्या हाताच्या बरगड्यांखाली दोन ठिकाणी, दोघी मांड्यावर मागच्या बाजूला दोन, उजव्या बरगडीखाली उजव्या हाताच्या मनगटावर एक असे एकूण सात वार त्याच्या शरीरावर आढळून आले आहे. तर हात पायावर नखांनी ओरबाडले आहे. त्याला बेदम मारहाण केल्याचे या व्रणांवरून स्पष्ट होते. त्याच्या डोळ्यांतूनही रक्त आले होते. 
 
 
घटनास्थळावरून घेतले नमुने 
पोलिसांनी नवीद अख्तरचा मृतदेह आढळून आला त्या घटनास्थळावरील मातीत मिसळलेल्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. फॉरेन्सिक व्हॅनच्या मदतीने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. घटना उघडकीस आल्यानंतर शिरसोली गावातील शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती.
 
घटनेसंदर्भात काही पुरावे मिळण्यासाठी पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला, मात्र, ठोस माहिती हाती आली नाही. तसेच नवीदअख्तरचा मोबाइलदेखील गहाळ असल्याने तपास कामात अडथळा आला आहे. घटनास्थळी डॉग पथक नेण्यात आले होते. मात्र ते माग दाखवू शकले नाही. 
 
 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...