आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जळगावच्या तरुणाने बनवले केळी धागा काढण्याचे मशीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - वायाजाणा-या केळी खांबाचे आता मूल्यवर्धन करता येणार आहे. जळगाव शहरातील एका तरुणाने वाया जाणा-या केळी खांबापासून धागा तयार करण्याचे यंत्र विकसित केले असून यामुळे केळीउत्पादकांना दोन पैसे मिळणार आहे. केळीवर आधारित अनेक बायप्रॉडक्ट आहेत. त्यात केळी धागा हा महत्वाचा असून औद्योगिक क्षेत्रात विशेष मागणी आहे.

जुन्या जळगावातील कांचननगरात राहणारा किशोर प्रकाश मराठे याने हे यंत्र तयार केले आहे. यंत्र तयार करण्यासाठी त्याला पाल येथील कृषी केंद्रातील विषयविशेषज्ज्ञ अशोक देशेट्टी यांनी मार्गदर्शन केले. या यंत्राची चाचणी करवून तीन महिन्यांत यंत्र बनवले. या यंत्राचे डिझाईनही अत्यंत साधे आहे. ४० ते ५० हजार रुपये खर्च आल्याचे मराठे सांगतात.

धाग्यापासून केलेली सुतळी.
यंत्राची कार्यक्षमता केळीधागा बनवण्याचे यंत्र विजेवर असून तीन एचपीच्या मोटारीवर चालणारे आहे. त्याचे वजन ४० ते ५० किलो आहे. प्रतितास पाच ते सहा किलो धागा निगतो. या धाग्यापासून घरगुती शोभेच्या वस्तू, सुतळी, दोरखंड, कापड बनविले जातात.

*धाग्याने अर्थप्राप्त
तीनमहीन्यात विविध चाचण्या घेऊन हे मशीन बनले. कमी वेळात यावर जास्त धागा काढला जातो. शेतकरी पूरक उद्योग म्हणून धागा विक्रीतून अर्थप्राप्ती मिळवू शकतील. अशोकदेशेट्टी, कृषी विज्ञान केंद्र, पाल

शेतक-यांना मशीन देणार
केळीउद्योगासाठी अनेक यंत्रे विकसीत करायची आहेत. मोठ्याप्रमाणात धाग्याला मागणी असल्याने त्याचे काम हे मशीन देऊन करणार आहोत. त्यासाठी करार करून धागा खरेदी होईल. किशोरमराठे, जुने जळगाव

पूरकउद्योगाला चालना
केळीधाग्याच्या या यंत्रामुळे वाया जाणारे केळी खांबाचा उपयोग होऊन धागा निर्मिती करता येणार आहे. तसेच खांबातून निघणा-या गराचाही उपयोग रंगनिर्मितीसाठी होत असल्याने त्याची विक्री करता येईल. केळी धाग्याला हस्तकलेच्या वस्तूंसाठी मोठी मागणी आहे. धागा काढताना निघणा-या पाण्यातही पोटॅशचे प्रमाण आहे. गांडूळखत बनविताना त्याचा उपयोग होतो. केळी बागेलाही ड्रिचिंग करता या पाण्याचा उपयोग करता येईल.