आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि. प. सदस्यांनी काढले कामाचे वाभाडे, प्रशासनाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सिंचन बंधार्‍यांच्या चौकशीकामी जिल्हा परिषद प्रशासनाकडून कारवाई होत नसल्यामुळे आम्हाला चौकशी अहवालाची प्रत द्या, आम्ही न्यायालयात जाऊन न्याय मिळवू, असा पवित्रा जिल्हा परिषद सदस्यांनी सर्वसाधारण सभेत घेतला. सदस्यांनी अधिकार्‍यांच्या कामकाजाबाबत आक्षेप घेत त्यांच्या कार्याचे वाभाडे काढले. दरम्यान, सामुदायिक पाणीपुरवठा योजनांची गाव योजनानिहाय पाणीपट्टीचे दर ठरविण्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी अध्यक्ष दिलीप खोडपे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, शिक्षण समिती सभापती रक्षा खडसे, समाजकल्याण समिती सभापती राजेंद्र राठोड, महिला व बालकल्याण समिती सभापती लीला सोनवणे, कृषी समिती सभापती कांताबाई मराठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कुटे उपस्थित होत्या. दरवेळप्रमाणे सभेचा र्शी गणेशा साठवण बंधार्‍यांच्या चौकशीवरून झाला. यावेळीदेखील सदस्यांची निराशाच झाली. याप्रकरणी संबंधितांची विभागीय चौकशीसाठी दोषारोप प्रत शासनाला पाठविल्याची माहिती सीईओंनी दिली. त्यावर सदस्यांचे समाधान झाले नाही. चोपडा तालुक्यातील तीन बंधार्‍यांच्या कामांची चौकशी करायला वर्ष उलटले. चाळीसगाव, रावेर तालुक्यातील बंधार्‍यांच्या कामाचे काय? या प्रo्नांवरून सभागृहात चांगलाच गोंधळ उडाला. शेवटी कंटाळूून सदस्यांनी चौकशी अहवाल आम्हाला द्या, आम्ही न्यायालयातून दाद मिळवू, असा पवित्रा घेतला.