आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद सदस्यांना हवा सेस फंडातून लॅपटॉप

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जिल्हा परिषदेच्या सदस्यांना सेस फंडातून लॅपटॉप उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव अध्यक्षांकडे सादर करण्यात आला आहे. एकीकडे शासनाने ग्रामपंचायती ऑनलाइन केल्या तर दुसरीकडे जिल्हा परिषद सदस्यांना लॅपटॉपसाठी निधी उपलब्ध करून देत नसल्याने नाराजी व्यक्त होते.

महा-ई ऑनलाइनमुळे ग्रामपंचायती जिल्हा परिषदेला जोडल्या गेल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सची सुविधा झाली आहे. त्यामुळे आता सदस्यांनाही शासकीय योजनांची माहिती आणि अध्यादेश तत्काळ उपलब्ध व्हावे यासाठी सदस्यांनी जिल्हा परिषदेकडे लॅपटॉपची मागणी केली आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी अध्यक्ष दिलीप खोडपे यांच्याकडे मागणी केली.

लॅपटॉपविषयी बहुतेक सदस्यांकडून होकार आहे. मात्र, ते उपलब्ध करून द्यायचे कसे हा प्रo्न आहे. याबाबत प्रशासनाशी चर्चा करू. दिलीप खोडपे, अध्यक्ष, जिल्हा परिषद

लॅपटॉपविषयी अध्यक्षांना प्रस्ताव दिला आहे. टंचाईत सदस्यांना लॅपटॉप कशाला असा मुद्दा पुढे येवू शकतो. सदस्यांनी वित्त आयोगाचा निधीची रक्कम टंचाईसाठी दिली आहे. विनोद तराळ, राष्ट्रवादी कॉँग्रेस