आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव जि.प. मध्ये भाजपला 24-28, तर राष्ट्रवादीस 17-20 जागा मिळण्‍याचा अंदाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा परिषदेत स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी मतांचा जाेगवा मागणाऱ्या राजकीय पक्षांना या वेळी देखील एकहाती सत्तेपासून लांब रहावे लागणार अाहे. मतदानानंतर ‘दिव्य मराठी’ने विविध गटातील मतदार, कार्यकर्ते, राजकीय पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून सर्वेक्षण केले. 
 
यात या वेळी देखील जिल्हा परिषदेत राजकीय पक्षांच्या संख्याबळाची त्रिशंकू स्थिती राहिल. भाजप पहिल्या क्रमांकावर तर राष्ट्रवादी, शिवसेना अाणि काँग्रेस अनुक्रमे  दुसऱ्या, तिसऱ्या अाणि चाैथ्या क्रमांकावर असेल. राष्ट्रवादी- काँग्रेस यांची अाघाडी असल्याने भाजप-शिवसेना एकत्र अाल्यास पुन्हा युतीलाच सत्ता स्थापन करता येणार अाहे. दरम्यान, काही गटांमध्ये स्थानिक राजकारण, तडजाेडीसह अटीतटीच्या लढती असल्याने जिल्हाभरातील ११ ते १२ गट निकालाचे चित्र बदलतील असे चित्र अाहे.   

या गटांत चित्र बदलाची शक्यता    
मतदार, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी मतदानानंतर केलेल्या चर्चेनुसार जामनेर तालुक्यातील वाकाेद-पहूर, पाळधी -लाेंढरी या गटात भाजप-राष्ट्रवादीतील लढत भाजपसाठी धक्कादायक निकाल देणारी ठरेल. रावेरमध्ये पाल-केऱ्हाळा गटात भाजप-काँग्रेसमध्ये काट्याची लढत अाहे. मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव -रुईखेडा गटात भाजप-शिवसेनेमध्ये लढत अाहे. अमळनेरमध्ये मुडी प्र-मांडळ, पाराेळा तालुक्यात देवगाव-तामसवाडी, मंगरूळ -शिरसमणी, पाचाेऱ्यात पिंपळगाव-शिंदाड, लाेहटार -खडकदेवळा, चाळीसगावमध्ये बहाळ-कळमडू या गटांमध्ये निकालाबाबत अनिश्चितता व्यक्त केली जात अाहे. या गटांमधील निकाल चारही प्रमुख पक्षांसाठी अटीतटीच्या लढती अाहेत. यातील निकाल देखील धक्कादायक ठरण्याची चिन्हे अाहेत.    
 
बातम्या आणखी आहेत...