आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - उन्हाळा सुरू झाला की पाणीदार फळांची आठवण येते. बाजारातही टरबूज, खरबूज व आंबा या फळांची मागणी होत असते. बाजारात परदेशी फळांना पसंती दर्शविली जात असल्याने व्यापारीदेखील विविध प्रकारच्या परदेशी फळांना प्राधान्य देत आहेत. यंदा परदेशी खरबुजाची चव जळगावकरांना चाखायला मिळत आहे. अक्षयतृतीयेच्या मुहूर्ताला ज्या फळाची आपण पूजा करतो अशा खरबूजाचेही आता ऑस्ट्रेलियातून आगमन होत आहे. यापूर्वी द्राक्षे, सफरचंद, चिंच यासारखे अनेक परदेशी फळे बाजारात विक्रीस आलेली आहेत. या फळांचीही मोठय़ा प्रमाणात मागणी होती. त्याचप्रकारे खरबूजालाही पसंती मिळत आहे. शहरात प्रथमच याप्रकारचे फळ विक्रीस उपलब्ध झाले आहेत. अत्यंत गोड असणार्या या फळाला फ्रिजमध्ये ठेवल्यास आणखीनच चव गोड होते.
मुंबईहून होते आयात
इंडोनिशयन चिंच, कॅलिफोर्नियाची द्राक्षे, न्यूझिलंडच्या किवी पाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या खरबूजाचे नावही जुळले गेले आहे. ऑस्ट्रेलियातून याची आयात होत असून मुंबईच्या बाजारपेठेतून शहरात येते. ही सगळी फळे 15 दिवसांनी मागवण्यात येतात. परदेशातूनही 15 दिवसांनी ताज्या मालाची ऑर्डर देण्यात येते.
200 किलो दर आठवड्याला
मोसंबीसारखे पिवळे दिसणारे हे खरबूज आकारास लहान आहे. बाजारात 70 रुपये किलोप्रमाणे विक्रीस आहेत. दर आठवड्याला 200 किलो खरबूज मागवण्यात येतात. दिवसाला 40 ते 50 किलो खरबूजाची विक्री शहरात होत आहे. जास्तीत जास्त 15 दिवस खरबूज घरात चांगले राहू शकते.
केरळी आंबाही दाखल
परदेशी फळांसोबतच यंदा मार्च महिन्यात आंबा बाजारात दाखल झाला आहे. परंतु तो कोकणचा नसून केरळचा आंबा आहे. रसदार असलेल्या या आंब्यालादेखील शहरात पसंती मिळत आहे. यंदा बाजारात केरळी आंब्याची डिमांड अधिक आहे.
खरबूजला हमखास मागणी
लोकांना सगळ्या प्रकारची फळे हवी असतात. काहीतरी नवीन चव बाजारात आली तर त्याला खूप मागणी असते. तशीच मागणी खरबूजलाही आहे. खरबूजाला पसंत करणारे लोक तर हमखास या फळाची मागणी करतात. याकुब भाई, फळ विक्रेता
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.