आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावचा निकाल सलग दुसऱ्या वर्षीही घटला; मुलींच्या निकालात वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांगले गुण मिळाल्यानंतर आनंदित झालेल्या मैत्रिणींनी सेल्फी काढून हा आनंदाचा क्षण मोबाइलच्या कॅमेऱ्यात टिपला. - Divya Marathi
चांगले गुण मिळाल्यानंतर आनंदित झालेल्या मैत्रिणींनी सेल्फी काढून हा आनंदाचा क्षण मोबाइलच्या कॅमेऱ्यात टिपला.
जळगाव: आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर दहावीचा ऑनलाइन निकाल मंगळवारी जाहीर झाला. सलग दुसऱ्या वर्षी जळगाव शहराच्या निकालात घट झाली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा १.४ टक्क्यांनी निकाल घटला आहे. तर दुसरीकडे मुलींच्या निकालात १.६८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दहावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. जळगाव शहराचा एकूण ९०.५१ तर जिल्ह्याचा ८७.७८ टक्के निकाल लागला आहे. यात ए.टी. झांबरे विद्यालयाची स्नेहा झांबरे आणि जागृती पाटील या विद्यार्थिनींना ९९ टक्के गुण मिळवून यश मिळवले आहे.
 
जळगाव शहरात ६५ शाळांमधून हजार १७० मुले हजार १८७ मुली असे एकूण हजार ३५७ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यात हजार ६७९ मुले हजार ९८० असे एकूण हजार ६५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ८८.२३ टक्के मुले तर ९३.५० टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलींनी परंपरा कायम राखत निकालाचा आलेख सातत्याने चढता ठेवला आहे. सन २०१५ मध्ये जळगाव शहराचा निकाल ९२.७७ लागला होता. सन २०१६ मध्ये ९१.९१ तर यंदा ९०.५१ टक्के निकाल लागला आहे. ही आकडेवारी पाहता दहावीच्या निकालात सातत्याने घट होत असल्याचे समोर येते आहे. तसेच गेल्या वर्षी शाळांचा निकाल १०० टक्के लागला होता. शहरातील शाळांनी शंभरी गाठली आहे. 
 
शंभरी गाठणाऱ्या शाळा अशा 
न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, रोझलॅण्ड इंग्लिश मीडियम स्कूल, प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मीडियम स्कूल, अँग्लो उर्दू हायस्कूल, सेंट टेरेसा कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल, उज्ज्वल इंग्लिश स्कूल, आदर्श सिंधी हायस्कूल, बीयूएन रायसोनी मराठी मीडियम विद्यालय, श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय. 
 
निकालाची प्रतीक्षा अन् यशाचा जल्लोष : बारावी स्टेट बोर्ड, सीबीएसई दहावी सीबीएसई नंतर १५ दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे यंदा पालक विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा लागून होती. दरम्यान, मंगळवारी निकाल जाहीर होताच यशस्वी विद्यार्थ्यांसह पालकांनी जल्लोष केला. शाळांच्या परिसरातील सायबर कॅफेंवर गर्दी झाली होती. अनेकांनी मोबाइलवरूनच निकाल पाहिला. 
 
धुळे सलग दुसऱ्यांदा अव्वल 
नाशिक विभागात धुळे जिल्हा सलग दुसऱ्यांदा अव्वल ठरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धुळे जिल्ह्याचा निकाल ०.५७ टक्क्यांनी घटला आहे. तरीदेखील यंदा विभागात धुळे जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. यंदा धुळ्याचा निकाल ८९.७९ टक्के लागला आहे. त्या खालोखाल जळगाव ८७.७७, नाशिक ८७.४२ तर नंदुरबार ८६.३८ टक्क्यांवर आहे. 
 
साक्षी पर्वतेला ९१.९७टक्के
जयदुर्गा माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९५.१८ टक्के लागला. यात साक्षी विक्रम पर्वते (९१.९७) प्रथम, रागिनी भागवत पाटील (८९.९०) द्वितीय, मोहिनी माधव मिस्तरी ( ८८.८०) तृतीय क्रमांक, पल्लवी नरेंद्र सोनार (८५.२०), स्वाती गजानन धनावत (८३.४० ) टक्के गुण मिळवले. 
 
अलमत शरऊफ खाटीकचे यश 
तांबापुरातील युनिक एज्युकेशनल अॅण्ड वेल्फेअर सोसायटी संचलित हायस्कूलचा निकाल ८५ टक्के लागला. शेख अलतमश रऊफ खाटीक (८१.८०) प्रथम, नजमुरसहर सैयद साबीर अली (७८.२०) द्वितीय, शमसोद्दीन शेख शरफोद्दीन (७७.८०) तृतीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले. 
उज्ज्वल स्प्राउटर इंटरनॅशनलचा निकाल १०० टक्के निकाल लागला. यात रिया मेहता (९३.८०) प्रथम, प्रतीक मंडोरा (९३.६०) द्वितीय, रजत सावदेकर (९२.४०) तृतीय आले. यासह उन्नती जाधव, हंसिका लाठी, अपूर्वा महाजन, कुंजल पटेल, प्रेरणा खिंवसरा यांनी ९० पेक्षा अधिक गुण मिळवले. तर साक्षी बोरा, ऋतुजा बाविस्कर, आचल महाजन, धून काबरा, मोनिषा रावेरकर यांनी विशेष प्रावीण्य मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. 
 
जागृती डॉक्टर होणार 
जागृती नितीन पाटील हिनेही डॉक्टर होण्याची इच्छा व्यक्त केली. तिचे वडील लघुपाटबंधारे खात्यात वाहनचालक आहेत, तर आई गृहिणी आहे. तिला वडिलांसह मामांचे सतत मार्गदर्शन मिळत राहिले. तिने वर्षाच्या सुरुवातीपासून नियमित अभ्यास केला. परीक्षेच्या वेळी रिव्हिजन केले. तिची वैद्यकीय क्षेत्रात करिअरची इच्छा केली. 
 
स्नेहाची मेडिकलला जाण्याची इच्छा 
ए.टी.झांबरे विद्यालयाच्या विद्यार्थिनी स्नेहा संजय झांबरे जागृती नितीन पाटील या दोघींना ९९ टक्के असे समान गुण मिळाले आहेत. विद्यालयासह शहरातून या दोघी प्रथम आल्या आहेत. स्नेहाचे वडील पाटबंधारे खात्यात क्लर्क असून, आई गृहिणी आहे. अभ्यासाची कोणतीही घोकंपट्टी करता नियोजनबद्ध अभ्यासावर स्नेहाने भर दिला. तिने मेडिकलला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...