आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डान्स प्लस-२’ स्पर्धेत जळगावचा तनय मल्हारा विजेता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - खासगी वाहिनीवरील ‘डान्स प्लस-२’ या नृत्य स्पर्धेत जळगावचा तनय मल्हारा हा दर्शकांच्या मतांच्या आधारावर विजेता ठरला आहे. २५ लाख रुपयांचे पहिले बक्षीस तसेच कार इतरही बक्षिसांचा वर्षाव त्याच्यावर झाला. या वेळी कुस्तीमधील कांस्यपदक मिळविणारी साक्षी मलिक, अभिनेता रणबीर कपूर हे उपस्थित होते.

अवघ्या १४ वर्षांचा सर्वात कमी वयाचा ‘डान्सिंग आयकॉन’ होण्याचा मान त्याला मिळाला आहे. स्पर्धेत वाइल्ड रिपर्स फर्स्ट रनरअप, तर पीयूष भगत सेकंड रनरअप ठरला. तनयच्या विजयाचे वृत्त जळगावत पोहोचताच अनेक ठिकाणी फटाके फोडून त्याचे स्वागत करण्यात आले. तनयला जळगावची, साऱ्या खान्देशाची समर्थ साथ मिळाली.

मुंबईत खासगी वाहिनीच्या स्टुडिओत झालेल्या ग्रँड फिनालेत रंगारंग कार्यक्रमानंतर दर्शकांच्या दिलेल्या मतांचा निकाल जाहीर करण्यात येऊन तनयला विजेता घोषित करण्यात आले तेव्हा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला. जुलैपासून सुरू झालेल्या तनयच्या अभियानाची यशस्वी सांगता झाली. या वेळी तनयचे वडील आनंद मल्हारा, अाई नलिनी मल्हारा अाणि कुटुंबीय उपस्थित होते. तनयने अत्यंत भावुक होऊन सर्वांचे आभार मानले. अभिनेता रणबीर कपूरने तनयचे तोंडभरून कौतुक केले.

छायाचित्र: अभिनेता रणबीर कपूरसाेबत तनय मल्हारा.
बातम्या आणखी आहेत...