आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आयटीआय’समोर शववाहिकेला ट्रकने दिली जोरदार धडक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - राष्ट्रीय महामार्गावरील शासकीय आयटीआयसमोर सोमवारी वाळू वाहतूक करणार्‍या भरधाव ट्रकने शववाहिकेला जोरदार धडक दिली. त्यात शववाहिकेचे मोठे नुकसान झाले, मात्र जिवितहानी टळली.

खोटेनगर भागाकडून वाळू वाहतूक करणारा ट्रक क्र. एमएच 19झेड 3336 भरधाव शहराकडे येत होता. त्यावेळी शहराकडून खोटेनगरकडे जाणार्‍या शववाहिकेला क्रमांक एमसीसी 2216 ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात वाहनाचे मोठष नुकसान झाले. ही शववाहिका खोटेनगरचे नगरसेवक मनोज चौधरी यांची आहे. या अपघातात शववाहिकेच्या चालकाला सुदैवाने किरकोळ दुखापत झाली आहे. महामार्गावरून येताना हा ट्रक चुकीच्या दिशेने चालला होता.