आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाेटबंदी विराेधातील शहर काँग्रेसच्या जनआक्रोश आंदोलनाचा निघाला ‘दम’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला ५०० व १०००च्या जुन्या नाेट चलनातून बंद केल्या. या निर्णयाबाबत विविध मतभिन्नता दिसून येत आहे. या निर्णयाच्या विराेधात साेमवारी शहर राष्ट्रीय काँग्रेसतर्फे जनआक्रोश अांदाेलन केले. तर काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधानांनी याेग्य निर्णय घेतल्याने जी. एम. फाउंडेशन पुरस्कृत विविध संस्था संघटनांतर्फे जन समर्थन रॅली काढली. या दाेन्ही ठिकाणी सामान्य नागरिकांचा फारसा सहभाग नव्हता. तसेच कार्यकर्त्यांची संख्यादेखील शंभराच्या अात हाेती. त्यामुळे काँग्रेसच्या अांदाेलनाचा ‘दम’ निघालेला दिसला तर रॅली फक्त सोपस्कार ठरली. दाेन्ही अायाेजकांनी ४०० नागरिक सहभागी झाल्याचा दावा केला आहे. दरम्यान, नाेटबंदीला विराेध करण्यासाठी साेमवारी भारतबंदचे अावाहन करण्यात अाले हाेते. परंतु, बंदचा शहरात कुठेही परिणाम दिसून अाला नाही. मार्केटमधील सर्व दुकाने, अास्थापना, शासकीय कार्यालये सुरळीत सुरू हाेते.
नीर फाउंडेशनची समर्थन रॅली
नोटबंदीच्यासमर्थनार्थ नीर फाउंडेशनसह विविध संस्था संघटनांनी साेमवारी खान्देश सेंट्रलपासून समर्थन रॅली काढली. यात मोदींचे मोठे कटआऊट लावून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. 'बरसो बाद तो भारत ने दौडना शुरू किया है.. अब भारत बंद कैसे होगा...' असे फलक लक्ष वेधून घेत होते. यात शालेय महाविद्यालयीन युवकांचा सहभाग दिसून आला. शिवतीर्थ मैदान ते स्वातंत्र्य चौकमार्गे ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आली. त्या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मंुडके यांना निवेदन देण्यात अाले. अरविंद देशमुख संस्थेचे अध्यक्ष सागर महाजन यांनी तरुणांना या विषयी मार्गदर्शन केले. या वेळी ओमप्रकाश कुमार, विजय तुलसी, भावेश रोहिमारे, किरण कावडे, बिभीषण घुमरे, मुकेश सोनवणे, बंडू चव्हाण, परमेश्वर दास, समीर तडवी, सौरभ जैन, नीलेश जोशी, हरीष महाजन, राहुल दायमा, गोपाल निकम उपस्थित होते.

व्यापाऱ्यांचे मानले आभार
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोट बंदीच्या विरोधात सोमवारी राष्ट्रीय काँग्रेसतर्फे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. तसेच भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. परंतु त्यांच्या आवाहनाला शहरातील व्याऱ्यांनी प्रतिसाद देता दुकाने सुरू ठेवली होती. त्यामुळे दुकाने सुरू ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांचे भाजपतर्फे आमदार सुरेश भोळे कार्यकर्त्यांनी गुलाबपुष्प देऊन आभार मानले.

हमारे पैसे हम ही चोर, जनता जनार्दन की ललकार, मत कर मोदी अत्याचार
राष्ट्रीय काँग्रेसतर्फे दुपारी २ वाजता काँग्रेस भवनापासून जनआक्रोश मोर्चास सुरुवात झाली. नोटबंदीच्या विरोधातील फलक कार्यकर्त्यांच्या हातात होते. ‘मोदी सरकार हाय हाय, सह वाह रे मोदी तेरा जोर.. हमारे पैसे हम ही चोर.. जनता जनार्दन की ललकार, मत कर मोदी अत्याचार’ या घोषणा देत मोर्चेकरी टॉवर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचले. मोर्चात ६० मोर्चेकऱ्यांशिवाय अधिक गर्दी नव्हती. महानगराध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, शहर अध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे या दोन्ही डॉक्टरांशिवाय पक्षातील वजनदार व्यक्तींचा यात समावेश नव्हता. डॉ. चौधरी ध्वनिक्षेपणावरून नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करीत होते. अर्ध्या तासात मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. त्या ठिकाणी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मंुडके यांना निवेदन देण्यात अाले. आंदोलनाचे नेतृत्व तालुकाध्यक्ष संजय वराडे, कपिल अहमद, श्याम तायडे, जगदीश गाढे, वसंत सोनवणे, श्रीधर चौधरी, परवेझ पठाण, अमजद पठाण यांनी केले.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे निवेदन
नोटबंदीच्या निर्णयाचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने निषेध केला. कोणतीही तयारी न करता हा निर्णय घेतल्याने कामगार व श्रमजीवींचे हाल होत असल्याचे निवेदन त्यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. या वेळी माकपचे राज्य कमिटी सदस्य प्रकाश चौधरी, कलावती पाटील, ताराबाई महाजन, सिंधू अस्वार, रफिक पिंजारी, वसंत पाटील उपस्थित होते. काँग्रेसच्या मोर्चात संघटना सहभागी झाली होती.

भारतबंदला शून्य प्रतिसाद
नोटबंदीच्या विरोधात सोमवारी भारतबंदचे आवाहन गेल्या काही दिवसांपासून व्हॉट््सअॅपसह विविध माध्यमातून केले जात होते. मात्र, सोमवारी या आंदोलनाचा जळगाव शहरात थोडाही परिणाम कुठेही दिसून आला नाही. शहरात दिवसभर सर्वच मार्केट व बाजारपेठेतील दुकाने सुरळीत सुरू होती. तसेच शासकीय कार्यालयामध्ये उपस्थितीचे प्रमाणदेखील कायम होते. काँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सोडला तर कोणत्याच राजकीय पक्षाने ‘भारत बंद’मध्ये सहभाग नोंदवला नाही. त्यामुळे बंदला शून्य प्रतिसाद मिळाला.
बातम्या आणखी आहेत...