आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पारोळेकर’च बँक नुकसानीस जबाबदार, संचालक अँड. विजय पाटील यांचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्मचारी भरती रखडणे आणि बँकेचे नुकसान होण्यासाठी दोन्ही ‘पारोळेकर’ संचालक जबाबदार असल्याचा आरोप संचालक अँड.विजय नवल पाटील यांनी केला. त्यांच्या वैयक्तिक राजकारणामुळे बँकेचे हित धोक्यात आल्याचे पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले.
जिल्हा बँकेच्या संचालकांच्या दिवसागणिक भूमिका बदलत असल्याने नवनवीन राजकीय समीकरणे उदयाला येत आहेत. यापूर्वी वसंत साखर कारखाना विक्री करण्याऐवजी तो खासगीरीत्या चालविण्यास द्यावा, म्हणून त्यांनी विक्रीला विरोध केला होता. त्या वेळी त्यांनी बँकेचे अध्यक्ष चिमणराव पाटील आणि डॉ. सतीश पाटील यांच्या वैयक्तिक वादामुळे बँकेचे नुकसान होत असल्याचा आरोप केला होता. यावेळी बँकेतील घडामोडींबाबत ते काहीसे अलिप्त होते; मात्र शनिवारी त्यांनी अखेर आपले मौन सोडले.

मुदतवाढीकडे लक्ष
बॅँकेचे इतर संचालक मात्र सहकार आयुक्तांकडून भरतीला मुदतवाढ मिळते किंवा नाही याकडे लक्ष ठेवून आहेत. मुदतवाढीचा ठराव घेऊन तातडीने पुणे गाठलेले कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख पुन्हा जळगावात दाखल झाले आहेत. ठरावावर निर्णय घेण्यासाठी वेळ लागणार असल्याने संचालकांची निराशा झाली आहे.