आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 पेक्षा जास्त उमेदवार असतील तर दोन मशीन!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - वॉर्ड ऐवजी प्रभाग रचनेमुळे महापालिकेच्या निवडणुकीत एका मतदाराला दोन जणांना मतदान करावे लागणार आहे. तशी व्यवस्था इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रात केली जाणार असून एका प्रभागात 16 पेक्षा जास्त उमेदवार असल्यास दोन बॅलेट मशीन उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत वॉर्डनिहाय मतदान घेण्यात आले होते. त्यामुळे एका वॉर्डात एक उमेदवार याप्रमाणे मतदान झाले होते. यंदाची निवडणूक प्रभागनिहाय होणार आहे. त्यामुळे यंदा 35 प्रभागातून 77 उमेदवारांना निवडून द्यायचे आहे. एका प्रभागात तीन उमेदवार वगळता इतर सर्व प्रभागांमध्ये दोन उमेदवार असतील. तर प्रभाग 34 मधील मतदारांना तीनवेळा मतदान करण्याची संधी मिळणार आहे. तथापि, या बदलानुसार इलेक्ट्रॉनिक्स बॅलेट मशीनमध्ये त्यानुसार डाटा फीड केला जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिका यंत्रणेकडेच मतदान यंत्र उपलब्ध होणार आहेत.

एकालाही करता येणार मतदान
एका वॉर्डात 16पेक्षा अधिक उमेदवार असतील तर अशा ठिकाणी ‘अ’ आणि ‘ब’ क्रमांकाचे दोन बॅलेट मशीन असतील. 16पेक्षा कमी उमेदवार असतील तर एकाच बॅलेटमध्ये मतदानाची व्यवस्था केली जाणार आहे. नागरिकांना एकाच उमेदवाराला मतदान करायचे असेल तर ती देखील सुविधा उपलब्ध आहे. पसंतीनुसार उमेदवारापुढील बीफ दाबल्यानंतर खालच्या बाजूस असलेल्या ‘एण्ड’ हे बटन दाबल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल. तसेच केंद्रात येऊन कुणालाच मतदान करायचे नसेल तर स्वतंत्र रजिस्टरमध्ये त्या व्यक्तीचे नाव नोंदवून घेतले जाणार आहे.