आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव : आजी-माजी नगरसेवकांमध्ये निवडणुकांपूर्वी जुंपली!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होण्यापूर्वीच गणेश कॉलनीतील आजी-माजी नगरसेवकांमध्ये जुंपली आहे. निवडणुकीस उभे राहता येऊ नये म्हणून घरांच्या अतिक्रमणाचा मुद्दा पुढे केला जात आहे. तसेच पालिका प्रशासनाकडून याबाबत समाधान न झाल्यास दोघांची न्यायालयात जाण्याची तयारी आहे.

भारतीय जनता पक्षाच्या जयश्री नितीन पाटील या शहरातील गणेश कॉलनी भागातील विद्यमान नगरसेविका आहेत. तसेच याच परिसरात माजी नगरसेवक डी.डी.वाणी व माजी नगरसेविका हेमलता वाणी यांचा रहिवास आहे. नवीन वॉर्डरचनेनुसार या वेळी आजी व माजी दोघे याच वॉर्डातून लढण्यास इच्छुक आहेत. जयश्री पाटील यांच्या घराचे बांधकाम करताना नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप वाणी यांनी केला आहे. बांधकामाची सत्यता न पडताळता पालिकेच्या नगररचना विभागाने पूर्णत्वाचा दाखला दिला असून, संबंधित बांधकामाची फेरतपासणी करण्याची मागणीही त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. दुसरीकडे डी.डी.वाणी यांच्या घराचे बांधकामही नियमबाह्य असल्याची तक्रार जयश्री पाटील यांच्या पतीने केली होती. दोघांच्या तक्रारी लोकशाही दिनात निकाली काढण्यात आल्या आहेत; मात्र निवडणूक जवळ येत असल्याने एकमेकांच्या मार्गात अडचणी निर्माण करण्यासाठी दोघेही प्रय}शील असल्याचे समजते.

बांधकाम नियमानुसार

पिंप्राळा ग्रामपंचायत असताना बांधकामाला परवानगी घेतली असली तरी, पालिकेच्या नियमानुसार मार्जिन सोडले आहे. तसेच पालिकेने पूर्णत्वाचा दाखलाही दिला आहे. प्रत्यक्षात वाणी यांच्या घराचे वॉल कंपाउंड चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आले आहे. याशिवाय 12 भाडेकरू असताना आठच व त्यांचे भाडेही कमी दाखवण्यात आले आहे. नितीन पाटील

न्याय मिळण्याची अपेक्षा
अनधिकृत बांधकाम असतानाही महापालिकेच्या अधिकार्‍यांनी पूर्णत्वाचा दाखला दिला आहे. अनधिकृत बांधकामाची फेरमोजणी होऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी. तसेच नियमबाह्य बांधकाम केल्याप्रकरणी विद्यमान नगरसेविका जयश्री नितीन पाटील यांचे पद रद्द करून त्यांना सहा वर्षांसाठी अपात्र घोषित करण्यात यावे. याबाबत पालिकेकडून न्याय मिळण्याची आम्हाला अपेक्षा आहे. डी.डी.वाणी, माजी नगरसेवक