आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात गँगवॉर :शिवसेना पदाधिका-याच्या घरावर हल्ला, गोळीबार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरात दोन गटातील गॅँगवॉर पुन्हा उफाळून आले आहे. रविवारी रात्री शिवसेना उपमहानगरप्रमुख चेतन शिरसाळे यांच्या घरावर दगडफेक करून गोळीबार करण्यात आला, सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले.
माजी नगरसेवक अरुण शिरसाळे यांचे बंधू चेतन यांच्या शिंदी कॉलनीतील घरावर रात्री नऊ वाजेच्या सुमारास स्कॉर्पिओमधून (एमएस 19 एएक्स 8) आलेल्या हिस्ट्री सिटर आबा बाविस्कर व काही कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. तसेच त्यांच्या घरासमोरील तीन दुचाकी व कारचीही तोडफोड केली. हल्लेखोरांनी पिस्तूलाने चार राउंड फायरही केले. परंतु या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. पोलिसांनी विवेक मुंदडा, कैलास गवळी, धनराज सपकाळे, संगम भोई या चार हल्लेखोरांना ताब्यात घेतले असून त्यांची गाडीही जप्त करण्यात आली आहे. तर आबा बावीस्कर फरार झाला. त्याच्यावर यापूर्वी खूनाचा गुन्हा दाखल आहे.
काही वर्षापूर्वी आबा बाविस्करचा मामा शालीक सोनवणे याचा खून झाला होता. हा खून चेतनचा भाऊ अर्जून शिरसाळे यांनी केला असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. कित्येक दिवस न्यायालयात खटला चालल्यानंतर त्यातून अर्जून शिरसाळेंची निर्दोष मुक्तता झाली होती. या वैमस्यातून हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी 15 जून रोजी इच्छा देवी मंदीराजवळ शिरसाळे यांना एकट्यात अडवून चॉपरने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता.