आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव: घरकुल प्रकरणाच्या तपासाने गेल्या काही दिवसांपासून ‘ब्रेक’ घेतल्यानंतर आता या तपासाची दुसरी इनिंग सुरू झाली आहे. त्यानुसार शनिवारी तपासाधिकारी इशू सिंधू यांनी माजी महापौर रमेश जैन व नगरसेवक नितीन लढ्ढांसह वाघूर जलवाहिनीचे ठेकेदार दीपेश कोटेचा यांना चौकशीसाठी बोलावले आहे. तशी नोटीस त्यांना शुक्रवारी देण्यात आली आहे.
थंडावलेल्या घरकुल प्रकरणाच्या चौकशी सत्राची दुसरी इनिंग शनिवारपासून सुरू करण्यात येणार आहे. तपासाधिकारी सिंधू यांनी या प्रकरणात न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणारे माजी महापौर रमेश जैन व नितीन लढ्ढा, वाघूरच्या ठेकेदार दीपेश कोटेचा यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात दुपारी 12 वाजता चौकशीसाठी बोलावले आहे. सिंधू व नितीन नेहूल चौकशी करतील.
यापूर्वीही बोलावले होते चौकशीला
माजी महापौर रमेश जैन यांना तपासाधिकार सिंधू यांनी यापूर्वीदेखील चौकशीसाठी बोलावले होते. त्या वेळी चौकशीची नोटीस देण्यास गेलेल्या पोलिसांना जैन यांच्या घरून ते चार दिवस बाहेरगावी गेले असल्याचे सांगण्यात आले होते. तथापि, त्याच्या दुसर्याच दिवशी जैन हे चारही आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी न्यायालयात हजर होते. त्यामुळे राहिलेली चौकशी आज होणार आहे.
आणखी काहींची चौकशी
या प्रकरणात जैन व लढ्ढा यांच्यासोबतच आणखी काही जणांचीदेखील चौकशी होणार आहे. तपासातील कागदपत्रांची पडताळणी व इतर बाबींमधून ज्यांची नावे पुढे आली आहेत, त्यांची चौकशी तपासाधिकारी करतील.
सर्व नगरसेवकांची होणार चौकशी
घरकुलबाबत शहर पोलिस ठाण्यात 2006 साली दाखल गुन्ह्यातील सर्व आरोपींच्या चौकशीचे सत्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ही चौकशी सिंधू करतील.
वाघूरच्या ठेकेदाराची चौकशी
घरकुल प्रकरणाची चौकशी सुरू असतांनाच तपासधिकारी सिंधू यांनी आता वाघूर योजेनेच ठेकेदार कोटेचा यांना चौकशीसाठी बोलाविल्याने वाघूर जलवाहिनीच्या कामाचीही चौकशी सुरू होते की, काय अशी शंका व्यक्त होत आहे. घरकुल सोबतच वाघूरच्या चौकशीमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
काळेंच्या काळातील ठरावांची माहिती मागविली
घरकुल घोटाळ्यात अटक असलेले तत्कालीन मुख्याधिकारी पी.डी. काळे यांच्या काळात त्यांनी जिल्हाधिकार्यांकडे विखंडित करण्यासाठी पाठवलेल्या ठरावांची माहिती तपासाधिकारी इशू सिंधू यांनी मागविल्यामुळे महापालिकेत शुक्रवारी सायंकाळी तातडीने हालचाली सुरू झाल्या. अटकसत्रानंतर अनेक जण चौकशीच्या फेर्यात येत असून तपासाधिकारी इशू सिंधू बारीकसारीक गोष्टी तपासून पाहत आहेत. त्याचाच भाग म्हणून काळे यांनी त्यांच्या नियुक्तीच्या 1 जानेवारी 1998 ते 9 जुलै 2000 दरम्यानच्या काळात नगरपालिकेत जनरल मीटिंगमध्ये किंवा स्थायी समितीमध्ये पारित करण्यात आलेल्या ठरावांपैकी किती ठराव जिल्हाधिकार्यांकडे विखंडित करण्यासाठी पाठविले आहेत, याची माहिती पालिकेकडून मागवली आहे.
सायंकाळी तातडीने निघाले आदेश
तपासाधिकारी सिंधूंनी मागवलेल्या माहितीमुळे सायंकाळी तातडीने कार्यालयीन आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यात सर्व विभाग प्रमुखांना उद्देशून दिलेल्या आदेशात पी.डी. काळेंच्या काळातील ठराव विखंडित करण्याकामी पाठविण्यात आलेले आहेत किंवा नाही? पाठवलेले असतील तर तो ठराव क्रमांक, दिनांक व ठरावाची छायांकित प्रत माहितीसह दोन दिवसात उपलब्धकरून देण्याचे आदेश उपायुक्तांनी काढले आहेत. त्यात माहिती दोन दिवसात सादर करण्यासंदर्भात नमूद असून मुदतीत माहिती प्राप्त न झाल्यास पुढील होणार्या परिणामास आपण व्यक्तिश: जबाबदार राहणार असल्याचे म्हटले आहे.
उशिरापर्यंत चालले काम
सायंकाळी 6 वाजेपर्यंत रिकामी होणारी मनपाची सतरा मजली इमारत माहिती मागवल्याने बरेच विभागप्रमुख व कर्मचारी रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत कार्यालयात थांबून होते. त्यामुळे महापालिकेच्या बर्याच मजल्यावरील लाइट सुरू होते. सन 2000 नंतर नियुक्ती झालेले बरेच कर्मचारी नवीन असल्याने जुनी माहिती काढण्याचे मोठे आव्हान असल्याने अनेकांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे जुनी माहिती शोधण्यासाठी जुन्यांची मदत घेण्याचा मार्ग स्वीकारत आहेत.
काळेंनी खरंच ठराव पाठवले का
पी.डी. काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात तीन वर्षांत झालेले ठराव जिल्हाधिकार्यांकडे विखंडित करण्यासाठी पाठवले होते का? असा प्रo्न मनपा कर्मचार्यांच्या वतरुळात चर्चीला जात आहे. त्यामुळे विभागप्रमुखांकडून मिळणार्या माहितीनंतरच ते उघड होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.