आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठमजली उभारणार! पालिका आणि शासनाच्या परवानगीसाठी हालचाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - नाशिक व औरंगाबादप्रमाणे जळगावातही अपार्टमेंट संस्कृतीला पसंती मिळत आहे. तथापि, पालिकेच्या नगररचना विभागाकडून 18 मीटर उंचीपर्यंतच परवानगी दिली जात असल्याने शहरात केवळ सहामजली अपार्टमेंटची उभारणी झाली आहे. यापुढे जाऊन आठमजली इमारतींच्या उभारणीसाठी काही बांधकाम व्यावसायिक इच्छुक आहेत. त्यासाठी राज्य शासनाकडे पालिकेने पाठवलेल्या 24 मीटरच्या प्रलंबित प्रस्तावाला मान्यता मिळवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
घरांच्या किमती तीनपटीने वाढल्याने मध्यमवर्गीयांचे घराचे स्वप्न साकारण्यात अडचणी येत होत्या. शहरात अपार्टमेंट संस्कृती पचनी पडण्यास सुरुवातीला थोडा वेळ लागला असला तरी, कमी किमतींमुळे ग्राहक अपार्टमेंटकडे वळत आहेत. औरंगाबाद व नाशिकपाठोपाठ आता जळगावकरही अपार्टमेंट संस्कृतीला स्वीकारू लागल्याने बांधकाम व्यावसायिकांनी अपार्टमेंट उभारणीकडे लक्ष वेधले आहे. महापालिका हद्दीत सध्या 1 लाखावर मालमत्ता असून, त्यातील अपार्टमेंटची संख्या सुमारे 500च्या जवळपास आहे. महापालिका हद्दीत 15 मीटर उंचीपर्यंत अपार्टमेंट बांधकामास परवानगी दिली जाते. त्यात पाच मजल्यांपर्यंत इमारत बांधकाम होऊ शकते. तथापि, काही इमारतींना 18 मीटरपर्यंत परवानगी देण्यात आली असून, त्यात सहा मजले होऊ शकतात; मात्र यापुढे जाऊन आता 24 मीटर उंचीपर्यंत परवानगी मिळवण्याच्या हालचाली काही बांधकाम व्यावसायिकांकडून सुरू आहेत.
मेहरूण तलावाकाठी आठमजली प्रकल्प
महापालिका हद्दीत मेहरूण तलाव परिसरात आठमजली 400 ते 500 फ्लॅट असलेल्या अपार्टमेंटचा भव्य प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी महापालिका प्रशासन आणि शासनाकडून परवानगी मिळण्यासंदर्भात हालचाली सुरू झालेल्या आहेत.