आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल घोटाळा: सुरेश जैन यांच्या जामीन अर्जावर 6 मे रोजी सुनावणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- घरकुल घोटाळ्यातील आरोपी आमदार सुरेश जैन यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात कोणतेही कामकाज झाले नाही. त्यामुळे या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 6 मे रोजी होणार आहे. दरम्यान, बचाव पक्षामुळेच आरोप निश्चितीस उशीर होत असल्याचे प्रतिज्ञापत्र सरकारी पक्षाने सोमवारी न्यायालयात सादर केले.
घरकूल घोटाळ्यात अटकेत असलेल्या जैन यांनी चौथ्यांदा जामीनासाठी अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. या अर्जातून आणि युक्तीवादातून आरोप निश्चिती होत नसल्याने जैन यांना जामीन देण्यात यावा अशी विनंती त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केली होती. आरोप निश्चितीच्या विलंबाला सरकार पक्षच जबाबदार आहे, असा त्यांचा युक्तीवाद होता.
गेल्या सोमवारी दोन्ही बाजूकडील युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने दोघांनाही 29 रोजी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र सोमवारी हे मॅटर बोर्डावरच न आल्यामुळे कामकाज होवू शकले नाही.
सरकार पक्षाचे वकील अ‍ॅड. संजय खर्डे-पाटील यांनी प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केले. या प्रतिज्ञापत्रातून त्यांनी आरोप निश्चीतीसाठी लागत असलेला उशीर हा आरोपी पक्षामुळे होत असल्याचे नमूद केले आहे. त्या शिवाय खटल्याचे कामकाज जळगाव न्यायालयात अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश व्ही. एस. दिक्षीत यांचे समोर सुरू असतांना दिक्षीत यांनी खटल्याची कोणतीही दखल घेतलेली नाही. आरोपींना समन्स, वॉरन्ट किंवा न्यायालयात हजर राहण्याबात कोणतीही सूचना न्यायालयाने अद्याप दिलेली नाही. या उलट आम्ही मात्र तारीख मागितलेली नाही, असेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. दरम्यान, जैन यांना जामीनाबाबत निर्णय मिळण्यासाठी आणखी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागेल.