आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव महापालिकेतील पडझडीचे मोजमाप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- आर्थिक स्थितीमुळे खिळखिळ्या झालेल्या पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या पडझडीसंदर्भात ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित केले होते. याप्रकरणी दखल घेत प्रशासनातर्फे सोमवारी अंतर्गत झालेल्या दुरवस्थेचे मोजमाप केले. त्याचा अहवाल तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

जळगाव पालिकेची स्थिती विदारक झाली असल्याकडे ‘दिव्य मराठी’ने लक्ष वेधल्यावर प्रशासनाला जाग आली. सोमवारी 1 ते 17 व्या मजल्यावरील पडझडीचे मोजमाप करण्यात आले. पालिकेच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या प्रकल्प अधिकारी एस. जे. बोरोले, भास्कर ताडे, अनिल जावळे यांनी केलेल्या मोजमाप संदर्भातील अहवाल प्रभारी आयुक्त जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. पालिकेतील 15 व्या मजल्यावर सर्वाधिक पडझड झाली असल्याची नोंद झाली आहे. या मजल्याच्या पोर्चच्या टाइल्स, शौचालय, दरवाजे आणि अन्य पडझडीचे प्रमाण अधिक आहे.

नवीन फर्निचरचा प्रस्ताव दुर्लक्षितच
पालिकेतील सर्व विभाग संगणकीकृत करण्यासाठी आवश्यक असलेले फर्निचर तयार करण्यासह संरचनात्मक बदल करण्याचा ठराव झाला होता. या दृष्टीने काम करण्यासाठी इंटेरियर डिझायनरकडून सर्व 17 मजल्यांच्या दुरुस्तीचा आराखडा तयार करण्यात आला आहे.