आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgoan Municipal Corporation Employee Loan EMI Issue

जळगाव महापालिकेने थकवले कर्मचार्‍यांच्या कर्जाचे हप्ते

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पालिकेतील बर्‍याच कर्मचार्‍यांनी ग. स. सोसायटी (सरकारी नोकरांची सहकारी सोसायटी) मधून विविध उद्देशासाठी कर्ज घेतले आहे. कर्जाचे हप्ते दरमहा कर्मचार्‍यांच्या पगारातून कपात केले जातात. मात्र, तीन महिन्यांपासून ही रक्कम संबंधितांकडे जमा झालेली नाही. कपात होऊनही रक्कम भरली न गेल्याने शहीद भगतसिंग कर्मचारी संघटना आंदोलनाच्या तयारीत आहे.
पालिकेतील काही कर्मचार्‍यांनी घर किंवा अन्य कारणासाठी ग. स. सोसायटी व इतर ठिकाणाहून कर्ज घेतलेली आहेत. या कर्जाच्या हप्त्यांची तसेच विमा कंपनीचे हप्ते दर महिन्याला कर्मचार्‍यांच्या पगारातून कपात केले जावून परस्पर भरले जातात. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून ही रक्कम भरणा करण्यात आलेली नाही. कर्मचार्‍यांच्या पगारातून कापली गेलेली सुमारे तीन कोटी रुपयांची रक्कम तातडीने भरण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. अन्यथा कपात होऊनही रक्कम भरली न गेल्यास या गोष्टीसाठी जबाबदार अधिकारी किंवा कर्मचार्‍यांवर फौजदारी कारवाई करण्याची परवानगी द्यावी, यासाठी शहीद भगतसिंग कर्मचारी संघटनेच्या हालचाली सुरू आहेत.
आल्यानंतर मध्यस्थी करणार्‍या सहकार्‍यांनी पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर संतप्त महिला जामनेरला निघून गेली. दुपारी बारा वाजेच्या सुमारास झालेली हाणामारी जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळपर्यंत चर्चेचा विषय होती.
कारवाईसाठी परवानगी मागणार
कर्मचार्‍यांच्या पगारातून कपात होणारी भविष्य निर्वाह निधीसह इतर कपातीची रक्कम वेळोवेळी संबंधिताच्या खात्यात भरणे गरजेचे असते. प्रशासनाने दोन-तीन महिन्यांपासून ही रक्कम भरणा केलेली नसल्याने कर्मचार्‍यांचे नुकसान होणार आहे. या प्रकरणी कारवाईसाठी आयुक्तांकडून परवानगी मागणार आहे. अनिल नाटेकर, अध्यक्ष, शहीद भगतसिंग कर्मचारी संघटना