आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या करवसुलीवरून जळगावात गोंधळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- कराच्या रकमेची पावती स्वीकारण्याच्या कारणावरून महापालिकेजवळील भगवती स्वीट मार्टवर शुक्रवारी सायंकाळी गोंधळ झाला. सूर्यास्तानंतर महापालिकेकडून कारवाईचा प्रयत्न झाल्याचा आरोप भाडेकरूने केला आहे, तर जागामालक आणि भाडेकरू यांच्यात वाद झाल्याचे महापालिकेच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

नवीपेठेत सुनील मालजी जैन यांच्या मालकीच्या जागेत भगवती स्वीट मार्टचे चालक चैनसिंह पुरोहित भाडेकरू आहेत. संबंधित मालमत्तेच्या कराचे 99 हजार रुपये थकबाकीचे बिल देण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी तीन दिवसांपासून जात आहेत. मात्र, कराची रक्कम भरण्यासंदर्भात भाडेकरू व मालक यांच्यात वाद असल्याने दोघांपैकी कोणीही बिल घेत नाही. त्यामुळे प्रभाग अधिकारी उदय पाटील यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी गेले होते. या ठिकाणी मालक व भाडेकरू यांच्यात वाद झाल्याने त्यांनीच दुकान बंद करून घेतल्याचे प्रभाग अधिकार्‍यांचे म्हणणे आहे; तर महापालिकेकडून सूर्यास्तानंतर जप्तीची कारवाई करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार भाडेकरूने केली असून या प्रकरणाच्या चौकशीची मागणीही त्याने केली आहे.