आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचे मार्केट, घरकुलासह भूखंड विभाग वसुलीत नापास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शासनाचे शून्य अनुदान, एलबीटी वसुलीचा खडतर प्रवास अशा स्थितीत संकटांची मालिका सहन करत वसुलीसाठी झटणाऱ्या महापालिका प्रशासनाने एकूण उद्दिष्टांच्या ६१ टक्के वसुलीचा पल्ला गाठला आहे. यात हक्काचे उत्पन्न असलेल्या मार्केट, खुला भूखंड घरकुल विभागाची वसुली अतिशय निराशाजनक राहिली आहे. व्यापाऱ्यांची भरणा करण्याची मानसिकता असतानाही गेल्या वर्षाच्या तुलनेत अपेक्षित एलबीटी वसुली झाल्याने महसूलची अब्रू वाचली आहे.

महापालिका प्रशासन ६१३ कोटींचे कर्ज डाेक्यावर घेऊन एकेक दिवस पार करीत आहे. दररोजचे उत्पन्न कर्जफेडीत जात आहे. यातून काही रक्कम हाती राहील पगार होतील, अशी आजची स्थिती हाेऊन बसली आहे.

गेल्या दाेन महिन्यात मालमत्ता कराची चांगली वसुली कराल तरच पगार मिळतील अन्यथा कारवाई हाेईल, असे फतवेच काढण्यात आले. त्यामुळे सकाळ, दुपार, संध्याकाळ सगळ्याच विभागातील कर्मचारी झपाटून वसुलीच्या कामाला लागले होते. यामुळे अनेकदा नागरिकांची नाराजीही ओढवली गेली. परंतु नाईलाज होता. आता नाही तर कधीच नाही, अशीच अवस्था झाली होती. गेल्या दोन महिन्यांतील कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे पालिकेच्या उत्पन्नात कधी नव्हे इतकी भर पडल्याचे सांगितले जात आहे.

तीन विभागांवर भर द्यावा
महापालिकेच्यादैनंदिन कर वसुलीच्या माध्यमातून तिजाेरीत सतत पैसा येत असताे. परंतु गेल्या काही वर्षांत घरकुलात राहणाऱ्या गरिबांपासून ते भूखंड खरेदी करून लाखाे रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या सर्वसाधारण श्रीमंतांनी पालिकेचा कर बुडवून पालिकेला अडचणीत आणले आहे. तर पालिका मालकीच्या मार्केटमधून अपेक्षित वसुली हाती लागलेली नाही. मार्केट वसुलीत कोटी लाख ९७ हजार ६६७ रुपयांची मागणी होती. त्यापैकी कोटी ७८ लाख ७५ हजार ६०४ रुपयांची वसुली झाली आहे. किरकोळ वसुली विभागाकडे कोटींची मागणी होती. त्यापैकी कोटी ७० लाखांची वसुली झाली आहे. घरकुल वसुली विभागाची १२ कोटी १० लाख ३९ हजार ७५५ रुपयांची मागणी होती. मात्र, वर्षभरात केवळ १७ लाख हजार ८२६ रुपयांची वसुली हाती लागली आहे. त्यामुळे पालिकेसमाेर तब्बल १२ कोटी रुपयांच्या वसुलीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. खुला भूखंड विभागात २८ कोटी ६२ लाख २९ हजार ४०८ रुपयांची मागणी होती. मात्र केवळ कोटी लाख ७५ हजार ५०६ रूपये वसुली कर्मचाऱ्यांनी केली आहेे.

प्रभाग समित्यांची ३७ कोेटी लाख वसुली
चारहीप्रभाग समितीमधील कराची मागणी ५४ कोटी ११ लाख ९४ हजार २९७ होती. त्यापैकी ३७ कोटी लाख ३७ हजार ५७ रुपयांची वसुली झाली आहे. प्रभाग मध्ये १९ कोटी १८ लाख ३६ हजार ९४१ ची मागणी होती. त्यापैकी १३ कोटी ४० लाख हजार ३४ वसुली झाली. प्रभाग मध्ये कोटी ८२ लाख २८ हजार ८८६ ची मागणी असताना कोटी ४३ लाख हजार २८५ ची वसुली झाली. प्रभाग मध्ये १५ कोटी लाख हजार ८५४ ची मागणी असताना कोटी २२ लाख २६ हजार ५१९ ची वसुली करण्यात आली. प्रभाग मध्ये १० कोटी लाख २२ हजार ६१६ ची मागणी होती. त्यापैकी कोटी लाख हजार २१९ ची वसुली झाली. चारही प्रभाग समित्यांची ६८.५४ टक्के वसुली झाली आहे.
पुढील स्लाईडवर इतर माहिती