आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgoan Municipal Corporation News In Divya Marathi

सहीच्या एका फटकाऱ्यानिशी ७३ नगरसेवक ठरतील अपात्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिका आयुक्तांच्या एका सहीच्या फटकाऱ्यानिशी महापौर-उपमहापौरांसह ७३ नगरसेवक अपात्र ठरू शकतात, असे निदर्शनास आले आहे. पालिका अधिनियमानुसार नगरसेवकांनी प्रत्येक सहा महिन्यांच्या कालावधीत दोन क्षेत्रसभा घेणे अनिवार्य असून, या सभा घेतल्या नसल्यास पालिका आयुक्त अथवा राज्य शासन नगरसेवकांना अपात्र ठरवू शकते. या नियमानुसार जळगाव महापालिकेतील नव्या सभागृहात गेल्या वर्षभरात केवळ दोनच नगरसेवकांनी क्षेत्रसभा घेतल्या अाहेत. त्यामुळेच आयुक्तांनी ठरवल्यास महापौर-उपमहापौरांसह ७३ नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होऊ शकते.
जळगाव महापालिकेची सन २०१३मध्ये निवडणूक झाली होती. त्यानंतर प्रभाग ३५ (मेहरूण)मधील नगरसेवक सुनील पाटील आणि नगरसेविका सुमित्रा सोनवणे यांनी जून २०१४ आणि २२ जानेवारी २०१५ राेजी अशा दोन क्षेत्रसभा घेतल्या अाहेत. त्यात नागरिकांच्या समस्यांवर चर्चा होऊन रीतसर इतिवृत्तही तयार करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त महापालिका हद्दीतील इतर प्रभाग समित्यांमध्ये क्षेत्रसभा झाल्याच नसल्याचे निदर्शनास आले आहे.
अपात्रते संदर्भात अशी अाहे तरतूद
महाराष्ट्रमहापालिका अधिनियमातील कलम २९मध्ये क्षेत्रसभेसंदर्भात माहिती देण्यात अाली अाहे. २९ (क) नुसार दाेन क्षेत्रसभांमध्ये उलटलेला कालावधी हा सहा महिन्यांहून अधिक असणार नाही. तसेच २९ (क) २नुसार कार्याध्यक्ष, पाेटकलम (१)मध्ये तरतूद केल्याप्रमाणे दाेन वर्षांच्या कालावधीत सलग चार क्षेत्रसभा बाेलावण्यात कसूर करील, तर राज्य शासन राजपत्रातील अादेशाद्वारे अायुक्तांनी दिलेल्या निर्देशावरून पालिका सदस्य असण्यापासून त्यास अनर्ह ठरवेल.
क्षेत्रसभा म्हणजे काय?
ग्रामीणभागातील नागरिकांच्या समस्या साेडवण्यासाठी ज्याप्रमाणे ग्रामसभेची तरतूद करण्यात आली अाहे, त्याप्रमाणे महापालिका हद्दीतील नागरिकांच्या समस्या साेडवण्याकरिता महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम २९ 'ब'मध्ये त्यांच्या क्षेत्रात जाऊन क्षेत्रसभा घेण्याची तरतूद करण्यात अाली अाहे. या क्षेत्रसभेत उपस्थित नागरिकांकडून सुचवल्या जाणाऱ्या िवकास कामांना समस्या साेडवण्याला प्राधान्यक्रम देण्यासाठी क्षेत्रसभांचे महत्त्व अाहे. क्षेत्रसभेत राबवायच्या याेजना विकास कार्यक्रमांचे प्राधान्यक्रम सुचवून ते प्रभाग समिती किंवा महानगरपालिकेच्या विकास याेजनांमध्ये अंतर्भूत करण्यासाठी प्रभाग समित्यांकडे पाठवण्याचे काम क्षेत्रसभेचे असते. मात्र, प्रभाग समित्यांचे गठन झाले नसल्याचे कारण पुढे करत क्षेत्रसभा घेण्यात अाल्या नसल्याचे सांगण्यात येत अाहे. याबाबत राज्य शासन किंवा अायुक्तांनी ठरवल्यास महाराष्ट्र महापालिका अधिनियम २९ (क) २नुसार गेल्या अाणि या पंचवार्षिकमध्ये निवडून अालेल्या बहुतांश नगरसेवकांवर अपात्रतेचे संकट अाेढवू शकते.

ही अाहेत क्षेत्रसभेची कर्तव्ये
1) त्या भागात राबवायच्या याेजना विकास कार्यक्रमांचा प्राधान्यक्रम सुचवणे.
2) अशा याेजना कार्यक्रम प्रभाग समिती किंवा महापालिकेच्या विकास याेजनांमध्ये अंतर्भूत करण्यासाठी पाठवणे.
3) त्या भागातील रस्त्यांवर पथदिवे लावणे, सार्वजनिक ठिकाणी पाण्याचे नळ बसवणे, सार्वजनिक विहिरी स्वच्छतागृहे बांधण्यासह इतर साेयी-सुविधांसाठी जागा सुचवणे.
4) त्या भागातील पाणीपुरवठा, मलप्रवाह, सार्वजनिक स्वच्छता, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन दिवाबत्तीच्या व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी उपाययाेजना सुचवणे.
5) त्या भागातील सार्वजनिक अाराेग्य केंद्रात राबवल्या जाणारे राेगप्रतिबंधक उपक्रम, कुटंुबकल्याण, साथीचे राेग, नैसर्गिक अापत्ती या घटनांची माहिती कळवण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे.
6) त्या भागातील नागरिकांना 'महापालिका कर' 'वापर कर' अाकारण्याबाबत अाठवण करून देणे.
क्षेत्रसभा हाेत नसल्याने समस्यांकडे दुर्लक्ष
निवडून अाल्यावर काही नगरसेवक पाच वर्षे वाॅर्डात फिरकतही नाहीत. क्षेत्रसभा झाल्यास संबंधित वाॅर्डाचा नगरसेव अाणि पालिका अधिकाऱ्यांसमाेर नागरिक अापल्या समस्या मांडून त्या मार्गी लावून घेतल्या जाऊ शकतात. मात्र, क्षेत्रसभाच हाेत नसल्याने समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे.
दीपक गुप्ता, माहिती अधिकार कार्यकर्ता
क्षेत्रसभाघेतल्यास अपात्रतेची तरतूद
^महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम २९-क (१), (२) नुसार सहा महिन्याच्या अंतरात दाेन सभा किंवा दाेन वर्षाच्या कालावधीत सलग चार क्षेत्रसभा बाेलवण्यात कसूर केल्यास सभेचा कार्याध्यक्ष पालिका सदस्य अपात्र ठरू शकताे. अॅड.संजय राणे