आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोब्राच्या दंशानंतरही मिळाले महिलेला जीवदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सर्पांमध्ये अतिविषारी समजल्या जाणार्‍या कोब्रा जातीच्या सर्पदंशानंतरही एक 35 वर्षीय महिलेला जीवदान देण्यात जळगावातील साईकिरण हॉस्पिटलच्या डॉक्टरांना यश आले आहे. पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील सुनीता गायकवाड असे या महिलेचे नाव आहे.

सुनीता गायकवाड यांना 28 जुलै रोजी सकाळी 6 वाजता सर्पदंश झाला होता. त्यानंतर रुग्णालयात हलवत असताना त्यांच्या परिवारातील सदस्यांनी सर्पमित्र आतीश चांगरे यांना बोलावून दंश करणार्‍या सापाला पकडले होते. तो साप ‘स्पेवटल्ड कोब्रा’ असल्याची खात्री चांगरे यांनी केली होती.

तसेच सुनीता गायकवाड यांच्या मुलाने दंश झालेल्या जागी ब्लेडने चिरा मारून दूषित रक्त काढून घेतले होते; मात्र तरीही त्या बेशुद्ध होत्या. त्यामुळे त्यांना तशाच अवस्थेत पाचोरा रुग्णालयात दाखल केले; मात्र प्रकृती अत्यवस्थ बनल्यामुळे त्यांना जळगावच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुन्हा साईकिरण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तोपर्यंत त्यांचे शरीर शिथिल झाले होते. त्यामुळे त्यांची प्रकृती खूपच नाजूक झाली होती.

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनाआले यश
साईकिरण हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर श्वासोच्छ्वास घेण्यासही अडचणी येत होत्या. डॉक्टरांनी त्यांना व्हेंटिलेटर मशीनच्या साह्याने कृत्रिम श्वासोच्छवास पुरवला. याशिवाय ‘अँटिस्नेक व्हेनम’च्या 15 बाटल्या शिरेतून व सलाइनच्या माध्यमातून त्यांच्या शरीरात सोडण्यात आल्या. सतत तीन दिवसांच्या उपचारानंतर सुनीता पूर्णपणे बर्‍या झाल्या. त्यासाठी डॉ.किरण सोनवणे यांच्यासह इतर डॉक्टरांनीही अथक प्रयत्नकेले.