आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमपीएससीत जळगावच्या विद्यार्थ्यांचा डंका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महाराष्ट्र लाेकसेवा अायाेगातर्फे राज्यसेवेच्या वर्ग अाणि वर्ग २च्या पदांकरिता घेण्यात अालेल्या परीक्षेत जळगावच्या ३३विद्यार्थ्यांनी बाजी मारली अाहे. त्यात मुकेश चव्हाण हा विद्यार्थी उपजिल्हािधकारीपदासाठी विमुक्त संवर्गातून राज्यातून प्रथम, प्रदीप मैराळे पाेिलस उपअधीक्षकपदासाठी अनुसूिचत जात संवर्गातून राज्यात प्रथम अाला.

जया रमेश काेल्हे (जावळे) गटविकास अिधकारीपदासाठी इतर मागासवर्गीय गटातून राज्यात दुस-या क्रमांकाने उत्तीर्ण झाली अाहे. दीपस्तंभ फाउंडेशन, दर्जी फाउंडेशन अाणि बेंडाळे महिला महािवद्यालय स्पर्धा परीक्षा केंद्राच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश अाहे.

निवड झालेले विद्यार्थी : उपजिल्हाधिकारी मुकेश चव्हाण(विमुक्त संवर्गातून प्रथम), विजयानंद स्वानंद शर्मा (खुल्या गटातून वा), विशाल शालिग्राम मेश्राम(अनुसूिचत जात संवर्गातून था), निवृत्ती हिरामण गायकवाड(अनुसूिचत जमात संवर्गातून रा), पाेलिस उपअधीक्षक- प्रदीप भिवसन मैराळे (अनुसूिचत जात संवर्गातून प्रथम), उपमुख्यकार्यकारी अधिकारी सतीश बुद्धे (अपंग संवर्गातून प्रथम), गटविकास अधिकारी - राेहित काटकर(खुल्या संवर्गातून प्रथम), जया रमेश काेल्हे (जावळे)( इतर मागासवर्गीय संवर्गातून द्वितीय), सायली चिखलीकर(अनुसूचित जाती संवर्गातून द्वितीय), किशाेर गज्जलवार(इतर मागासवर्गीय संवर्गातून तृतीय), सुवर्णा दिलीप बागल(खुल्या गटातून ७वी), सहायक विक्रीकर अायुक्त- संताेष परशुराम सूर्यवंशी(अनुसूिचत जमात संवर्गातून प्रथम), उपअधीक्षक भूमी अभिलेख - सुजीत जाधव(खुल्या संवर्गातून प्रथम), वर्षा लांडगे(खुल्या संवर्गातून क्रीडा विभागातून प्रथम), महेश सिंघल(खुल्या संवर्गातून प्रथम), कक्षाधिकारी-विशाल गाेविंदा शिरसाट(अनुसूचित जाती संवर्गातून द्वितीय), वित्त लेखाधिकारी- याेगीता सुभाष ठाकूर(अनुसूचित जमाती संवर्गातून मुलींमध्ये प्रथम), तहसीलदार- उमाकांत सीताराम पारधी(अनुसूिचत जमाती संवर्गातून प्रथम), प्रशांत सुभाष बेडसे(इतर मागसवर्गीय संवर्गातून तृतीय) नायब तहसीलदार- प्रतिभा शालिग्राम चाैधरी, राहुल नगराज वाघ, अाकाश रामहरी किसवे, महादेव शिवाजी करंडे, अमाेल दिलीप पाटील, अनिल तुकाराम नाडेकर, अनंता बापुराव पाटील, परेश चाैधरी, संदीप विजयसिंग माेरे, पंकज मगर, तुषार निकम, गणेश तळेकर, अाेंकार ठाकरे.