आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेत्यांच्या घरासमोरील रस्त्याला नियमीत मुलामा... समान्य गेले खड्ड्यात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - गेल्या चार दिवसांपासून ‘दिव्य मराठी’ने शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकला आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, काही लोकप्रतिनिधींच्या घराजवळील रस्ते चकाचक आहेत. ठेकेदारांनी रस्ते बनविताना एकाच प्रकारचे साहित्य वापरलेले असतानाही अशी तफावत का आढळते? या प्रश्नाला उत्तर देताना त्या नेत्यांची बोबडी वळली.

रस्ते नेत्यांच्या घरासमोरचे

अत्यल्प आणि छोटे खड्डेही वेळीच बुजवले आहेत.

काही नेत्यांच्या घरासमोरील रस्त्यांची नियमित झाडलोट.

प्रदीप रायसोनी यांच्या घरासमोरील रस्त्यावर पांढरे पट्टे.

रस्ते सर्वसामान्यांचे

छोटे खड्डे तर दूरच, मोठमोठे खड्डेही तसेच.

अनेक दिवस रस्त्यांवर कचरा साचल्याने दुर्गंधी.

मुख्य रस्त्यांवर अन् चौकातही नाहीत पांढरे पट्टे.

सत्ताधारी टक्केवारीने पैसे खातात
सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक आपल्या परिसरात काम करण्याकडे अधिक भर देतात. विकासकामांमध्ये सत्ताधार्‍यांना टक्केवारीने पैसे मिळवायचे असतात. त्यामुळे अनेकदा निकृष्ट दर्जाची कामे होतात. एकनाथ खडसे, विरोधी पक्षनेते, विधानसभा

योग्य पाठपुराव्यानेच कामे होतात
नेते, लोकप्रतिनिधींच्या परिसरात रस्ते करण्यासाठीचा पाठपुरावा योग्य पद्धतीने होतो. आमदार, खासदार शहराच्या विकासासाठी आपला निधी उपयोगात आणतात, त्यामुळे आपल्या परिसरात सुविधा पुरविण्याचा त्यांचा आग्रह असतो. किशोर पाटील, महापौर


शहराचा अद्याप अभ्यास नाही
लोकप्रतिनिधींचा महापालिकेवर दबाव नसतो. मी या शहरात नवीन असल्यामुळे अद्याप तसे निदर्शनासही आले नाही. त्यामुळे शहरातील लोकप्रतिनिधींच्या परिसरातील रस्ते कोणत्या गुणवत्तेचे आहेत, ते सांगता येणार नाही. संजय कापडणीस, महापालिका आयुक्त

यांनी उचलले नाहीत मोबाइल
यासंदर्भात माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर आणि प्रभारी शहर अभियंता डी.एस. खडके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी मोबाइल उचलले नाहीत.