आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ह्योच आमचा कोकण !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
12व्या शतकात गोरखनाथ व त्यांच्या शिष्यांनी मिळून जळगावातील मेहरूण तलावाचे खोदकाम केल्याच्या नोंदी आहेत. खोदकामानंतर पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर जळगाव शहर वसायला मदत झाली.
पालिकेने गत दोन वर्षांत वेळोवेळी गाळ काढण्याची मोहीम राबवल्याने तलावाची साठवण क्षमता वाढली आहे. सद्य:स्थितीत तलावात 32 दशलक्ष घनमीटर (एमएलडी) पाणीसाठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात आहे.
आठ ते दहा वर्षांपूर्वी शहरातील नागरिकांना तलावात बोटिंगचा आनंद घेता येत होता. यासाठी खासगी मक्तेदाराला मक्ता देण्यात आला होता. पुन्हा या ठिकाणी तशी सोय झाल्यास जळगावकरांना पर्यटनाचा आनंद आणि महापालिकेला उत्पन्न मिळेल.
74 हेक्टर क्षेत्रफळ असलेला मेहरूण तलाव सन 2006मध्ये झालेल्या अतिवृष्टीत रात्रीतून भरून ओसंडून वाहिला होता. यानंतर यंदा चांगला पाऊस झाल्याने तो ओसंडून वाहिला.
उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन थांबविण्यासाठी उंच झाडे लावून ग्रीन वॉलचे (हिरवी भिंत) काम सुरू झाले आहे. तलावाच्या पश्चिमेकडील बाजूस यावर्षी वृक्षारोपण करण्यात आलेले आहे.
बोटिग़ सुरू करण्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक असते. महापालिकेने अद्याप कुणालाही बोटिंगसाठीचा ठेका दिलेला नाही. पण त्यादिशेने प्रशासन विचार करेल, असे शहर अभियंता एस.एस. भोळे यांनी सांगितले.