आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बड्या थकबाकीदारांची नावे लावली भरचाैकातील बॅनरवर, पालिकेचे धाडसी पाऊल; ८ काेटींची थकबाकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव- शहरातील मालमत्ता कर व पाणीपट्टी थकबाकीसाठी नगरपालिकेने कंबर कसली असून मालमत्ता जप्तीची कारवाई व नळ कनेक्शनही कट करण्यात येणार आहे. बडे थकबाकीदारांची नावे असलेला फलक पालिकेने सिग्नल चाैकात लावल्याने खळबळ उडाली अाहे. यातील ८० टक्के थकबाकीदार धनदांडगे अाहेत. ज्यांच्याकडे ३० ते ३५ हजारांच्या वर थकबाकी अाहे. त्यांची नावे फलकावर लावण्यात आली अाहेत.

पालिका प्रशासनाने यापूर्वी थकबाकीदारांना वठणीवर अाणण्यासाठी इतके कडक पाऊल कधी उचलले नव्हते. परंतु वारंवार कळवूनही थकबाकी भरली जात नसल्याने पालिकेने हे धाडसी पाऊल उचलले. या कारवाईचे सर्वसामान्य नागरिक व नियमित कर भरणाऱ्या कुटुंबीयांनी याचे स्वागत केले अाहे. एक लाखपर्यंतची थकबाकी असणाराही या यादीत अाहे. नावाजलेल्या शिक्षण संस्थेचे संचालक, काही सहकारी संस्था, राजकीय, व्यवसायिक क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांचा थकबाकीदारांच्या यादीत नाव असल्याने त्यांची चांगलीच नाचक्की झाली आहे. अनेक जण फलकावरील नावे वाचत अाहेत.

वसुली पथकात १९  कर्मचाऱ्यांचा समावेश 
नगरपालिकेची थकबाकी तत्काळ भरून सहकार्य करावे. शहरात एक अधिकारी व १९ कर्मचाऱ्यांद्वारे थकबाकी वसुली सुरू करण्यात आली आहे. मुदतीत ही थकबाकी न भरल्यास कारवाई अटळ अाहे. शहाराच्या मुख्य चाैकात थकबाकीदारांच्या नावाचा फलक लावण्यात अाल्याने किमान पुढची कारवाई टाळण्यासाठी अातातरी थकबाकी भरावी, असे अावाहन पालिकेने केले अाहे. या फलकावर फक्त मुख्याधिकाऱ्यांचेच नाव अाहे.

पालिकेत स्वाइप मशीन; तर...मालमत्तेचा लिलाव 
शहरातील मालमत्ता थकबाकीदारांनी त्वरित नगरपालिका कार्यालयात येऊन थकबाकी भरावी. अन्यथा थकबाकीदारांच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव, जंगम व स्थावर मालमत्ता जप्ती व त्यांच्याकडील नळकनेक्शन तोडण्याची कारवाई करण्यात येणार आहे. वसुलीसाठी नगरपालिकेत डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे थकबाकी भरता येईल. यासाठी स्वाइप मशीन लावले अाहे.

८ काेटींची थकबाकी; पुन्हा कारवाईचा टप्पा
जप्तीची मोहीम सुरू करण्यात आली असून कारवाई टाळण्यासाठी थकबाकी तत्काळ भरण्याचे आवाहन मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग यांनी केले अाहे. १९ हजार मालमत्ताधारकांकडे नवी, जुनी मिळून ८ काेटींची थकबाकी अाहे. महाराष्ट्र शासनाने नगरपालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नगरपालिकेस घरपट्टी, पाणीपट्टी गाळे भाडे १०० टक्के वसूल करण्याविषयी आदेशनान्वये कळवले आहे. त्या अनुषंगाने नगरपालिकेने थकबाकीची विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सन २०१६-१७ अखेर घरपट्टी, पाणीपट्टी व गाळाभाडे १००% थकबाकी व चालू रक्कम वसूल करण्याकामी पथकाची नेमणूक केली असून अाठवडाभरापासून माेहीम तीव्र केली आहे. नंतरच्या काळात १० ते २० हजार रुपये थकबाकी असणाऱ्यांची नावे फलकावर लावली जाऊ शकतात.
बातम्या आणखी आहेत...