आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रक-मोटारसायकल अपघातात बाईकचा चुराळा; 1 जण ठार, 1 गंभीर जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धानोरा (जळगाव) - येथील बर्हाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गावर आस्था नगरीसमोर मंगळवारी सकाळी झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला असून इतर एक जण गंभीर जखमी आहे. अपघातातील कमळगाव तालुका चोपडा येथील राहीवाशी आहे. पोलीस घटनास्थळी उशीरा पोहचल्याने संतप्त जमावाने ट्रकच्या काचा फोडल्या. 
 
याबाबत सविस्तर वृत्त असे की मंगळवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास अडावदकडून धानोराकडे येत असलेल्या मोटारसायकल क्र. एमएच 19 बी.एल. 0723 ला समोरून येणाऱ्या ट्रक (क्र. एमपी 09 एचएफ 5576) ने जोरदार धडक दिली. यात बाईकस्वार अशोक चैत्राम धनगर वय 60 हे जागीच ठार झाले. तर राजेंद्र भास्कर बागुल (वय 40) यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. अपघात महामार्गावर झाल्याने बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. अडावद पोलीसांशी वारंवार संपर्क साधुन ही ते उशीरा घटनास्थळी पोहचले. यामुळे संतप्त जमावाने ट्रकच्या काचा फोडण्यास सुरुवात केली. सुज्ञ नागरीकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
बातम्या आणखी आहेत...