आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणकारी जांभळास 500 ते 600 रुपये कॅरेटचा भाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहाळ- परिसरातमोठ्या प्रमाणावर फळबागा आहेत. जांभळाचा हंगाम सुरू झाला असून जांभूळ विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहे. ५०० ते ६०० रुपये एका कॅरेटला भाव मिळत आहे.
आयुर्वेदात अतिशय महत्त्वाचे गुणकारी म्हणून जांभळाची ख्याती आहे. बहाळ परिसरातील शेतकरी जांभळाचे उत्पादन घेतात. गेल्या आठवड्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जांभळाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. हंगाम २१ ते ३० दिवसांचा असल्यामुळे जांभळाचे फळ पावसाने दांडी मारल्यामुळे अपरिपक्व राहिले आहे. त्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात भाव मिळत नाही. बहाळ परिसरातून पाच ते सहा गाड्या जांभूळ जळगाव, भुसावळ धुळे येथील बाजारात नेला जात आहे. जांभूळ तोडण्यासाठी मजुरांना ४०० रुपये रोज दिला जात आहे. सकाळी आठ ते चार वाजेपर्यंत एक मजूर चार ते पाच कॅरेट जांभूळ तोडतो. त्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांना मजुरी देण्यास परवडत नाही. बहाळ परिसरात पेरू, लिंबू, सीताफळ, डाळिंब आदी फळबागा आहेत, परंतु जांभळाची झाडे शेतकऱ्यांनी बांधावर लावलेली आहेत. या झाडांची ७/१२ उताऱ्यावर कुठलीही नोंद नाही. परिसरात १५००च्या वर जांभळाची झाडे आहेत.

आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान
जांभूळफळाला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. विविध आजारांवर गुणकारी असल्यामुळे पावसाळा सुरू होताच ग्राहकांकडून मागणी वाढते. वात. कफ, पित्त अशा आजारांवर जांभळाची बी वापरण्यात येते. त्यामुळे बहाळ परिसरातील शेतकऱ्यांची दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. यंदा जांभळाची अावक वाढली आहे. बाजारात जांभळाचा भाव १०० रुपये किलाे अाहे. शहरात विविध ठिकाणी जांभळे विक्री करणाऱ्या गाड्या उभ्या राहतात. यंदा मागील वर्षाप्रमाणेच भाव असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे अाहे. मात्र, ग्राहकांना जांभळू सेवन करण्याचे फायदे माहित नसल्याने त्यांच्याकडून जांभळाची मागणी कमी आहे.
बातम्या आणखी आहेत...