जामनेर - नगराध्यक्षपारस ललवाणींसह चौघांनी
आपल्या नगरसेविका आईसह वडिलांचे अपहरण केल्याची तक्रार शेख इम्रान शेख मनियार यांनी बुधवारी सकाळी जामनेर पोलिस ठाण्यात दिली. दरम्यान, सायंकाळी वाजेदरम्यान नगरसेविका हसिनाबी शेख महंमद मनियार यांनी स्वत: जामनेर पोलिस ठाण्यात फोन करून आपण पतीसोबत स्वखुशीने फिरायला बाहेरगावी गेल्याचे स्पष्ट केले.
पालिकेची गुरुवारी मासिक बैठक आहे. अजेंड्यात विषय क्रमांक १११ वर धारीवाल बंधूंच्या घराचे अतिक्रमण काढून रस्ता विकसित करण्याचा विषय घेण्यात आला आहे. सत्ताधारी गटाचे १४ नगरसेवक असले तरी अंतर्गत वादामुळे ते एकत्र येतीलच याची खात्री नाही. त्यामुळे हा ठराव बहुमताने पारित होऊन अतिक्रमण काढण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, यासाठी नगराध्यक्ष ललवाणी त्यांच्या समर्थकांनी चार दविसांपासून षडयंत्र चालवले आहे. ललवाणी, स्वीकृत नगरसेवक सुरेश धारीवाल, शंकर राजपूत गफ्फार शेख रसूल या चौघांनी मिळून नगरसेविका हसिनाबी मनियार वडील शेख मोहंमद मनियार यांचे मंगळवारी मध्यरात्री अपहरण केल्याची तक्रार शेख इम्रान शेख मनियार यांनी पोलिसात दिली. पोलिसांनी कारवाई केल्याने फिर्यादीने न्यायालयात धाव घेऊन शोध वारंटची मागणी केली. मात्र, आरोपींपैकी सुरेश धारीवाल हे न्यायालयात हजर झाल्याने शोध वारंट ऐवजी न्यायालयाने उर्वरित तिघांनाही गुरुवारी न्यायालयात हजर राहण्याच्या नोटीस बजावल्या आहेत.