आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोंगळ कारभार | सत्तांतरानंतर जामनेर पालिकेला १४ कोटींचा निधी प्राप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामनेर - रमाई घरकुल योजनेसाठीचा निधी वेळेत न खर्च झाल्याने १३ लाख रुपये व्याज भरण्याची नामुष्की जामनेर नगरपालिकेवर आेढवली आहे. त्याचप्रमाणे विविध योजनांसाठी मिळालेल्या १४ कोटी रुपयांपैकी गेल्या दीड वर्षांत एक रुपयाही खर्च होऊ शकला नसल्याने त्याही रकमेवर व्याज भरण्याची नामुष्की ओढवू शकते.

सन २०१११-१२ या आर्थिक वर्षात जामनेर नगरपालिकेला रमाई घरकुल योजनेंतर्गत १६१ घरकुलांसाठी कोटी ४५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. १६१ पैकी केवळ २६ घरकुलांचे काम पूर्ण झाले असून ८० घरे अद्याप किरकोळ कागदपत्रांच्या त्रुटीमुळे अपूर्ण आहेत. तीन वर्षांपासून अखर्चीत निधी पाहता शासनाने पालिकेकडून १३ लाख रुपये व्याज वसूल केले आहे. गेल्या दीड वर्षांपासून जामनेर पालिकेला विविध योजनांसाठी १२ कोटी ६० लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे. मात्र, पदाधिकाऱ्यांमधील वाद निविदा प्रक्रियेवरून सुरू असलेले वाद पाहता कोणतेही काम होऊ शकल्याने एकही रुपया खर्च होऊ शकला नाही.
पडून असलेला निधी मार्चपर्यंत खर्ची पडल्यास सव्याज परत करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवू शकते. या अखर्चीत निधीबाबत शासनाकडून दरमहा विचारणा होत असून पुढील आर्थिक वर्षांचा निधी देण्याचा निर्णय शासन घेऊ शकते, अशी सूचना मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी अधिकारी, पदाधिकाऱ्यांना दिली आहे.

वस्तुनिष्ठ अहवाल पाठवू
^राज्यात सर्वाधिक निधी जामनेर पालिकेला मिळाला आहे. मात्र, निधी वेळेत खर्च होत नाही. रमाई योजनेप्रमाणेच अन्य अखर्चीत निधीही सव्याज परत करण्याची नामुष्की संस्थेवर ओढवू शकते. अखर्चीत निधीबाबत शासनाकडून वारंवार विचारणा होत असून अधिकारी, पदाधिकाऱ्यांना वारंवार लेखी, तोंडी माहिती दिली आहे. त्यामुळे शहराचा विकास खोळंबला असून वेळेत काम झाल्यास विभागीय चौकशी होऊन कारवाई होऊ शकते. अखर्चीत निधीबाबत शासनाला वस्तुनिष्ठ अहवाल पाठविणार आहे. शोभाबाविस्कर, मुख्याधिकारी,न.पा.जामनेर

शहराचे दुर्दैव
^शहराचा सार्वजनिक विकास व्हावा, यासाठी पाठपुरावा करून आमदार, खासदार निधीसह अन्य तब्बल १५ कोटी रुपये निधी खेचून आणला. मात्र राजकीय द्वेशापोटी शहरातील जनतेला वेठीस धरले जात आहे. नियोजित कामांवर हा निधी खर्च झाल्यास सहा महिन्यात शहरातील ९० टक्के समस्या सुटून शहर स्वच्छ सुंदर होईल. मात्र, विकासकामे होऊन याचे श्रेय मला मिळू नये, असेच प्रयत्न विरोधकांचे आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मोठेपण दाखवून शहर विकासासाठी सहकार्य करावे. पारसललवाणी, नगराध्यक्ष,जामनेर

सत्ताधाऱ्यांमध्येच समन्वयाचा अभाव
^नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार शहराच्या विकासासाठी कायम सहकार्याचीच भावना ठेवली आहे; परंतु सत्ताधाऱ्यांमध्येच समन्वयाचा अभाव असून कमिशनखोरीसाठी वाद आहेत. निविदा मंजुरीचा घोळ सर्वश्रुत असून नगराध्यक्ष सत्ताधारी नगरसेवकांना तांत्रिक बाबींची माहिती नाही. सत्ताधाऱ्यांच्या हेकेखोर वृत्तीमुळे शहरविकास थांबला आहे. आपसात वाद असताना विरोधकांकडून सहकार्याची भावना ठेवणे चुकीचे आहे. आधी आपसातील वाद मिटवून तांत्रिक बाबींचा अभ्यास करावा नंतर आमच्याकडून अपेक्षा ठेवावी. महेंद्रबाविस्कर, विरोधीपक्षनेते, न.पा.जामनेर

विकास थांबला : शहरवासीयांना आरोग्य, दिवाबत्ती, पाणीपुरवठा यांसह अन्य सोईसुविधा पुरवण्यासाठी पालिकेला विविध योजनांच्या माध्यमातून शासनाकडून निधी पुरवला जातो. मात्र, जामनेर पालिकेत सत्ताधाऱ्यांसह विरोधकांमधील वाद पाहता गलिच्छ राजकारण सुरू आहे. यामुळे वर्षभराच्या कालावधीत राज्यात सर्वाधिक निधी मिळूनही जामनेर पालिका एक रुपयाही खर्च करू शकली नाही. सुविधा नसल्याचा फटका मात्र सर्वसामान्य जनतेला.