आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

४५ दिवसांत व्यवहार करणाऱ्या ग्राहकांनाच लाभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जन-धनयोजनेचे निव्वळ खाते उघडण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, बहुतांश खात्यांवरून कुठलेही व्यवहार होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे खाते उघडल्यानंतर ४५ दिवसांपर्यंत व्यवहार केल्यास विमा योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. दरम्यान, याबाबत स्थानिक स्तरावर नागरिक अजूनही अनभिज्ञ आहेत.

केंद्र शासनाने ज्या उद्देशातून जन-धन योजना सुरू केली, तो उद्देश अजूनही सफल होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासनाने पुन्हा नव्याने याबाबत जाहिरात करण्यावर भर दिला आहे. वास्तविक ही योजना सुरू करताना कोणतीही माहिती बंॅकांना दिली गेली नाही. सुरुवातीला फक्त खाते उघडून आणि जुजबी माहिती देऊन योजनेचा श्रीगणेशा करण्यात अाला. तसेच तिला पहिल्या टप्प्यात प्रतिसादही लवकर मिळाला. मात्र, फक्त झीरो बॅलन्सची खाती उघडली गेली त्यांच्यात कुठलाही व्यवहार झालेला नाही. त्यामुळे केंद्राच्या उद्देशाप्रमाणे पैसा चलनात आलेला नाही. खाते उघडल्यानंतर त्यावरून व्यवहार करणाऱ्या ग्राहकाला पाच ते १५ हजारांपर्यंत कर्जपुरवठा केला जाणार आहे. मात्र, याविषयी बहुतांश नागरिकांना माहितीच नसल्याचे िचत्र अाहे. त्यामुळे झीरो बॅलन्सची खाती अधिक असल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.
बॅंकादेखील अनभिज्ञ
खातेउघडणाऱ्या ग्राहकाला एक लाखाच्या अपघात विम्याचे कवच देण्यात आले आहे. मात्र, हा निधी कसा दिला जाईल? याविषयी बंॅकादेखील अनभिज्ञ आहेत. याव्यतिरिक्त नागरिकांमध्ये या योजनेविषयी वेगवेगळे गैरसमज निर्माण झाले आहेत. त्यामुळे योजनेचा उद्देश नागरिकांपर्यंत पोहाेचत नसल्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

आता ४५ दिवसांपर्यंत खात्यावरून व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना विमा योजनेचा लाभ दिला जाणार नाही. व्यवहार नसलेल्या खातेदारांना हजारांपासून मिळणाऱ्या कर्जाची सुविधाही मिळणार नसल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.
-जन-धन योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला अाहे. मात्र, गैरसमजांमुळे त्यावर व्यवहार होत नसल्याची िस्थती अाहे. बहुतांश नागरिकांनी झीरो बॅलन्स खाती उघडली आहेत. खात्यांवरून व्यवहार करणाऱ्या नागरिकांनाच या योजनेचे फायदे मिळणार आहेत. -दिलीप ठाकूर, सेंट्रलबँक

जिल्ह्यात दोन लाखांवर खाती
जिल्ह्यातआतापर्यंत दोन लाख २० हजार खाती उघडण्यात आली आहेत. त्यापैकी एक लाख ४३ हजार खाती ग्रामीण, तर ७७ हजार खाती शहरी भागातील आहेत. अजून खाते उघडणे सुरूच असून, शहरात बंॅंकांना वॉर्डनिहाय काम वाटून दिले आहे. त्यामुळे जो वॉर्ड ज्या बंॅकेकडे असेल त्या भागातील नागरिकांसाठी त्या बंॅकेत जाऊन खाते उघडण्याची सुविधा आहे. मात्र, त्यातही काही बंॅका नागरिकांना लांब पडत असल्याच्या तक्रारी आहेत.